IND vs NZ पाचव्या सामन्याआधी टीम इंडिया मोठा धक्का! निर्णायक सामन्याआधी मुख्य गोलंदाज बाहेर
टीम इंडियाचा कर्णधार देखील बदलला आहे, चौथ्या सामन्यामध्ये खराब फलंदाजीनंतर टीम इंडिया पाचव्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आता टीम इंडियामध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पाचवा सामना काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेमध्ये टीम इंडियाची आघाडी आहे, तिसरा सामना रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी असणार आहे. तर भारताच्या संघाला शेवटच्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी असणार आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये संघामध्ये काही महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आले आहेत. तर टीम इंडियाचा कर्णधार देखील बदलला आहे, चौथ्या सामन्यामध्ये खराब फलंदाजीनंतर टीम इंडिया पाचव्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आता टीम इंडियामध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे.
टीम इंडियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल कसोटी मालिकेची तयारी करत आहे त्यामुळे तो चौथा आणि पाचवा सामना खेळणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. आता पाचव्या सामन्याआधी भारतीय संघात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादवला भारतीय कसोटी संघामधून बाहेर केल्यानंतर गुरनुर ब्रारला कसोटी संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे गुरनुर ब्रार पाचव्या एकदिवसीय सामन्यामधून बाहेर झाला आहे कारण आता तो कसोटी संघाची तयारी करत आहे.
हे ही वाचा
4,4,4,4,4,4,4,4... पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर आर्यवीर सेहवागने केले खास सेलिब्रेशन! पहा Video
बीसीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी गुरनूर ब्रारच्या जागी कोणताही बदली खेळाडू असणार नाही. पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडीकरिता केवळ १४ खेळाडू उपलब्ध असतील. गुरनूरने आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 9 बळी घेतले असून, भारतीय संघाला या फॉर्मात असलेल्या गोलंदाजाची उणीव नक्कीच जाणवेल. भारताचा संघ एकदिवसीय मालिका झाल्यानंतर कसोटी मालिका दोन सामन्यांची खेळणार आहे, ही मालिका भारतीय संघासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे भारताचा संघ हा सध्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे.
पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाचा अद्ययावत संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर & उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, ऋतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.