नमन धीरचा विकेट घेतला अन् ब्लेअर टिकनरचं अनोखं सेलिब्रेशन! जाणून घ्या सेलिब्रेशन मागचं कारण, पहा Video
नमन धीरचा विकेट गेल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खास सेलिब्रेशन केले आहे या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत पाहायला मिळाला आहे, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारताला न्यूझीलंडच्या संघाने मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात पराभूत केले. भारताला शेवटच्या सामन्यामध्ये 7 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने पहिले दोन विकेट्स गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशनने संघासाठी चांगली फलंदाजी केली होती. पण या सामन्यात आता चर्चा ही नमन धीरच्या विकेटची होत आहे, नमन धीरचा विकेट गेल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खास सेलिब्रेशन केले आहे या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत पाहायला मिळाला आहे, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारतीय फलंदाज नमन धीरला बाद केल्यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज ब्लेअर टिकनरने इतक्या उत्साहाने जल्लोष केला की, सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. विकेट घेतल्यानंतर टिकनरने आपल्या खिशातून एक पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड काढले आणि ते कॅमेऱ्याला दाखवून एका खास पद्धतीने आनंद साजरा केला. ही घटना भारतीय डावाच्या 19 व्या ओव्हरमध्ये घडली. नमन धीरला बाद केल्यानंतर, ब्लेअर टिकनरने आपल्या सहकाऱ्यांसोबत विकेटचा आनंद साजरा केला. त्यानंतर त्याने अचानक आपल्या खिशात हात घालून एक पोकेमॉन कार्ड बाहेर काढले. टिकनरने ते कार्ड टीव्ही कॅमेऱ्यांसमोर आणले, त्याचे चुंबन घेतले आणि नंतर ते पुन्हा खिशात ठेवले.
नमन धीरने संघासाठी कमालीची कामगिरी या मालिकेमध्ये केली आहे, या मालिकेमध्ये नमन धीर टीम इंडियासाठी मालिकेमध्ये महत्वाचा अष्टपैलू होता गोलंदाजाने नमन धीरचा विकेट घेतल्यानंतर त्याने खास सेलिब्रेशन केले, त्याच्या शैलीने मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे आणि टीव्हीवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. गोलंदाज सहसा विकेट घेतल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष करतात, पण टिकनरचा जल्लोष इतरांपेक्षा वेगळा होता.
हे ही वाचा
टीम इंडिया पुढील सामना कधी खेळणार? RO-KO पुन्हा दिसणार मैदानात, वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
विकेट घेतल्यानंतर संघातील सदस्यांनी नेहमीप्रमाणे एकमेकांसोबत आनंद साजरा केला. त्यानंतर टिकनरने आपल्या खिशातून एक पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड काढले, ज्यावर लाल अग्नी ऊर्जेचे चिन्ह होते. त्याने कॅमेऱ्यासमोर कार्ड हलवले, त्याचे चुंबन घेतले आणि नंतर ते परत खिशात ठेवले. ही पद्धत इतर खेळाडूंच्या सेलिब्रेशनपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. सोशल मीडियावर चाहतेही या अनोख्या सेलिब्रेशनबद्दल चर्चा करू लागले.