SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बुमराह आणि जडेजा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज! 'या' दिवशी खेळणार सामना

मागील काही काळापासून टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी आहेत यामध्ये जसप्रीत बुमराहच्या नावाचा समावेश आहे, आता टीम इंडियात बुमराह पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 05, 2026, 09:17 PM IST | Updated: Nov 05, 2026, 09:40 PM IST
Join

भारतीय पुरुष संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, टीम इंडियाने टी20 मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडियाची एकदिवसीय मालिकेमध्ये देखील कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. भारताच्या संघाने एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयी केली आहे, टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे आतापर्यत 6 सामने झाले पण जसप्रीत बुमराह एकही सामन्यामध्ये खेळताना दिसला नाही त्याचे कारण म्हणजेच मागील काही काळापासून तो सातत्याने दुखापतीशी झुंजत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागत आहे. आता जसप्रीत बुमराह लवकरच संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यामध्ये अनधिकृत कसोटी मालिका खेळवली जात आहे, या मालिकेचे दोन्ही सामने हे अनिर्णयीत राहिले आहेत. आता तिसऱ्या आणि मालिकेच्या शेवटचा सामना शिल्लक आहे. अनधिकृत मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना हा 7 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे, या सामन्याचे आयोजन हे लिंकनमधील बर्ट सटक्लिफ ओव्हलवर करण्यात येणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे अनेक सुपरस्टार खेळाडू मैदानात उतरताना दिसतील. सुपरस्टार बुमराहसह पाच सुपरस्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे, भारत 'अ' संघ अंतिम सामन्यासाठी प्रबळ दावेदार दिसत आहे. 

हे ही वाचा

भारताने पाकिस्तानला आणखी एकदा हरवलं! टीम इंडियाची विजयी सुरुवात

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारत 'अ' संघाकडून खेळणार आहे. या सामन्याद्वारे बुमराह लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करून फॉर्ममध्ये परतण्याचा आणि कसोटी मालिकेपूर्वी आपला आत्मविश्वास वाढवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. भारतीय चाहते बऱ्याच काळापासून बुमराहची वाट पाहत आहेत. मागील काही महिन्यांपासून जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागले आहे. आगामी विश्वचषकासाठी ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. 

भारतामध्ये रणजी ट्रॅाफीचे सामने खेळवले जात आहेत यामध्ये रवींद्र जडेजाने कमालीची कामगिरी केली होती, त्याच्या या कामगिरीनंतर त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. आणखी एक अनुभवी खेळाडू, रवींद्र जडेजा, देखील या सामन्यात खेळताना दिसणार आहे. जडेजा नुकताच 2026-27 च्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळला होता, जिथे त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता जडेजा इंडिया 'अ' संघासाठी तोच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी तो आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकेल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES