मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती
Petrol, Diesel And CNG Rates : महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि उपनगरात CNG च्या दारात प्रतिकिलो एक रुपयांनी वाढ केली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील आजचे ताजे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात.
Petrol, Diesel And CNG Rates : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि उपनगरात CNG च्या दारात प्रतिकिलो एक रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो 90 रुपये इतका झाला असून हे दर 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजेच 1 नोव्हेंबरच्या पहाटेपासून लागू झाले आहेत. मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाच्या ताज्या किंमती जाहीर केल्या. मात्र यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे नोव्हेंबर महिन्यात सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधन दरात वाढ करेल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रतिलिटर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रतिलिटर किंमती :
दिल्ली ₹102.12
मुंबई ₹111.21
कोलकाता ₹113.51
चेन्नई ₹107.76
बेंगलुरु ₹111.68
हैदराबाद ₹116.15
गुरुग्राम ₹102.97
हेही वाचा : Live क्रिकेट सामन्यात अंपायर सोबत भयानक अपघात, मैदानातच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला
तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रतिलिटर किंमती :
दिल्ली ₹95.20
मुंबई ₹97.83
कोलकाता ₹99.82
चेन्नई ₹99.55
बेंगलुरु ₹99.56
हैदराबाद ₹104.23
गुरुग्राम ₹95.64
SMS द्वारे जाणून घ्या ताजे इंधन दर :
जर तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा जवळच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही इंडियन ऑइलच्या एसएमएस सुविधेचा वापर करू शकता. तुमच्या पेट्रोल पंपाचा 'डीलर कोड' शोधा. तुमच्या मोबाईलवरून RSP Dealer Code असा मजकूर लिहून 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवा. असे केल्यावर तुम्हाला संबंधित पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती मिळेल.