IPL 2027: ऑक्शनपूर्वी CSK-SRH चा मोठा डाव, 4 खेळाडूंची अदलाबदल; कोण कोणत्या संघात एकदा पाहाच
हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश असलेल्या या व्यवहाराच्या चर्चा सुरू असताना, सीएसकेने मोठा डाव खेळला आहे. एसआरएच आणि सीएसके या दोन संघामध्ये चार खेळाडूंची अदलाबदली करण्यात आली आहे.
आयपीएल 2027 च्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, मागील काही दिवसांपासून फ्रन्चायझींनी कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. आता मागील काही दिवसांपासून सीएसकेच्या ट्रेडबद्दल मोठी अपडेट पाहायला मिळत होती, आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश असलेल्या या व्यवहाराच्या चर्चा सुरू असताना, चेन्नईचे दोन खेळाडू हैदराबादमध्ये गेले आहेत आणि तेवढेच खेळाडू एसआरएचकडून सीएसकेमध्ये गेले आहेत. मात्र, या व्यवहारात केवळ एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे, तर उर्वरित तीन खेळाडू परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
आयपीएलच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे यामध्ये स्पष्टपण लिहीले आहे की, सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांना चेन्नई सुपर किंग्सकडे हस्तांतरित केले, तर सीएसकेने खलील अहमद आणि नॅथन एलिस यांना एसआरएचकडे हस्तांतरित केले. लियाम लिव्हिंगस्टोन 6 कोटी, जॅक एडवर्ड्स 3 कोटी, खलील अहमद 4.8 कोटी आणि नॅथन एलिस 2 कोटींची ट्रेड करण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने लियाम लिव्हिंगस्टोनसाठी फक्त 6 कोटी रुपये मोजले, ज्याला एसआरएचने 13 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, जॅक एडवर्ड्सला या हंगामातही तेवढीच रक्कम मिळेल जेवढी त्याला मागील सिझनमध्ये मिळाली होती. या सिझनमध्ये जॅक एडवर्ड्सला सीएसकेकडून 3 कोटी रुपये मिळतील. आगामी सिझनसाठी आयपीएलमध्ये 2027 च्या लिलावाआधी सीएसकेच्या संघामध्ये आणखी काही महत्त्वाचे ट्रेड होऊ शकतात. सीएसकेच्या संघाने खलील अहमदला वेगवान गोलंदाज खलीलला त्याच्या सध्याच्या 4.8 कोटी रुपयांच्या शुल्कावर करारबद्ध केले आहे, कारण त्याला फ्रँचायझीची चांगली समज आहे.
हे ही वाचा
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात कोहलीच ऐतिहासिक कामगिरी! अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
सीएसकेच्या संघाने काही दिवसांपूर्वीच त्यांचा संपूर्ण कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सीएसकेच्या संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अनेक अपडेट्स सीएसकेच्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत.