SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

CSK ने 90 धावांची खर्च केले 14.20 कोटी, आता IPL 2027 पूर्वी संघातून रिलीज करणार 'हा' खेळाडू

IPL 2027 : चेन्नई सुपरकिंग्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मात्र आयपीएल 2026 मध्ये एका खेळाडूला त्यांनी 14.20 कोटींना खरेदी केले होते. मात्र त्या खेळाडूला आता ते रिलीज करण्याची शक्यता व्यक्ती केली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 02, 2026, 02:23 PM IST | Updated: Nov 02, 2026, 03:01 PM IST
Image Credit: CSK ने 90 धावांची खर्च केले 14.20 कोटी, आता IPL 2027 पूर्वी संघातून रिलीज करणार 'हा' खेळाडू
Join

IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग 2027 च्या नव्या सीजनसाठी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे. त्याच्या आधी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व संघांना त्यांची रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. त्याआधी पाचवेळची चॅम्पियन असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गोव्यात यंदा आयपीएल 2027 चं ऑक्शन पार पडणार आहे. क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार सीएसके स्पिन ऑलराउंडर  प्रशांत वीरला रिलीज करू शकते. प्रशांत वीरला मागच्या सीजनसाठी अबुधाबी येथे झालेल्या ऑक्शनमध्ये सीएसकेने 14.20 कोटींना खरेदी केले होते. उत्तर प्रदेशच्या प्रशांत वीर शिवाय विकेटकिपर फलंदाज असलेल्या कार्तिक शर्माला सुद्धा सीएसकेने 14 कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली होती. कार्तिकने सीएसकेसाठी 11 सामन्यात एकूण 295 धावा केल्या होत्या.  

आयपीएल 2026 मध्ये प्रशांत वीरच्या परफॉर्मन्सबाबत बोलायचं झालं तर ते काही खास नव्हतं. प्रशांतने सीएसकेसाठी 6 सामने खेळले आणि 5 इनिंगमध्ये फक्त 90 धावा केल्या. प्रशांत गोलंदाजीत एकही विकेट घेऊ शकला नाही. हेच कारण आहे की फ्रेंचायझी प्रशांतला रिलीज करू शकते. अशाच प्रशांतला रिलीज केल्यावर सीएसकेचा संघ दुसऱ्या स्पिनर ऑलराऊंडरच्या शोधात असेल. रवींद्र जडेजाच्या संघातून गेल्यावर सीएसकेच्या संघाला त्याची कमतरता पूर्ण करू शकली नाहीये.

हेही वाचा : नमन धीरचा विकेट घेतली अन् ब्लेअर टिकनरचं अनोखं सेलिब्रेशन! जाणून घ्या सेलिब्रेशन मागचं कारण, पहा Video

आयपीएल 2026 च्या आधी प्रशांत वीरने उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. प्रशांतने त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीने प्रभावित केले. सीएसकेमध्ये त्याला भविष्यातील एक आश्वासक खेळाडू म्हणून पाहिले जात होते, परंतु तो आपली संधी साधू शकला नाही. मात्र, असेही मानले जात आहे की प्रशांतला रिलीज केल्यामुळे, गोव्यातील ऑक्शन दरम्यान सीएसके त्याला पुन्हा कमी किंमतीत आपल्या संघात सामील करून घेऊ शकेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES