• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /बॉल टॅम्परिंग वादात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजावर कारवाई, कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर काढलं

बॉल टॅम्परिंग वादात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजावर कारवाई, कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर काढलं

फॉक्स स्पोर्ट्सने डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या दोन दिग्गज क्रिकेटर्सना पुढील काही आठवड्यांसाठी कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 बॉल टॅम्परिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त खुलाश्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे कळतेय.

Reported Bypooja pawar
Published: Nov 21, 2026, 15:13 IST|Updated: Nov 21, 2026, 15:30 IST
joinshare
बॉल टॅम्परिंग वादात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजावर कारवाई, कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर काढलं
Image Credit: बॉल टॅम्परिंग वादात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजावर कारवाई, कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर काढलं

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Ball Tampering Scandal : वर्ष 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बॉल टॅम्परिंग केल्याचा मुद्दा मागील काही दिवसांपूर्वी पुन्हा चर्चेत आला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर उस्मान ख्वाजा याने त्याच्या पुस्तकात या बॉल टॅम्परिंग बाबत खुलासा करत म्हंटलं की याबाबत संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघाला ठाऊक होतं, मात्र शिक्षा काहीच खेळाडूंना देण्यात आली. उस्मान ख्वाजाने केलेल्या दाव्याला क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि पॅट कमिन्स सारख्या काही खेळाडूंनी नकार दिला. मात्र डेव्हिड वॉर्नरने उस्मान ख्वाजाचं हे म्हणणं बरोबर असल्याचं सांगितलं आणि सोशल मीडियावर सुद्धा याबाबत खुलासा करणाऱ्या पोस्ट लिहिल्या. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या दोन दिग्गज क्रिकेटर्सना पुढील काही आठवड्यांसाठी कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेटवर्कने स्पष्ट केले की हा जुना वाद पुन्हा उफाळून आल्यामुळे दोन्ही खेळाडूंवर निर्माण झालेला तीव्र दबाव लक्षात घेता, त्यांना त्यांच्या प्रसारण जबाबदाऱ्यांतून तात्पुरती सुट्टी देण्यात आलेली आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजावर का केली कारवाई?

फॉक्स स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक स्टीव्ह क्रॉली यांनी 'कोड स्पोर्ट्स'सोबतच्या संभाषणात या निर्णयाची पुष्टी केली. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, दोन्ही समालोचकांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. स्टीव्ह क्रॉली यांनी सांगितले की, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उस्मान आणि डेव्हिड या दोघांनाही पुढील काही आठवड्यांसाठी आमच्या प्रसारणांतून विश्रांती दिली जाईल. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जरी नेटवर्क आपल्या कॉमेंटेटर्स टीममधील सर्व सदस्यांचे समर्थन करत असेल आणि विविध मतांचे स्वागत करत असेल, तरीही प्रत्येक नवीन विधानावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांच्यावर असलेला प्रचंड दबावही नेटवर्कला समजतो.

क्रॉली यांच्या मते जोपर्यंत ही परिस्थिती कायम आहे. तोपर्यंत खेळावर लक्ष केंद्रित करणं अधिकाधिक कठीण होत चाललंय. दोन्ही कॉमेंटेटर्सना अशा परिस्थितीत ठेवणे अन्यायकारक ठरेल. अखेर त्यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियातील 'समर ऑफ क्रिकेट'चे सर्वोत्तम प्रसारण चाहत्यांपर्यंत पोहोचवणे हेच नेटवर्कचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून राहतील.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News