भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना पार पडला, या सामन्यामध्ये टीम इंडियाने डीएलएस मेथडने विजय मिळवला. भारताच्या संघाने मालिकेच्या सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मजबूत आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ विराट कोहलीशी संबंधित आहे. विराट कोहली हा अनेकदा मैदानावर असताना त्याच्या चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कधी नाचत असतो तर कधी त्यांचा उत्साह वाढवताना दिसतो. आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये विराट कोहली मैदानावर आलेल्या प्रेक्षकांवर संतापलेला पाहायला मिळत आहे.
भारतीय फलंदाजीचा दिग्गज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते त्याची स्वाक्षरी मिळवण्याच्या प्रयत्नात त्याच्यावर प्लास्टिकच्या बॅट फेकत आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांच्या या वागण्यामुळे कोहली नाराज झालेला दिसला. त्यानंतर कोहलीने प्लास्टिकची बॅट घेतली आणि तो मैदानाबाहेर गेला. मग त्याने चाहत्यांकडे हातवारे करून त्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. विराट कोहली प्लास्टिकची बॅट फेकलेल्या चाहत्यांवर संतापलेला पाहायला मिळत आहे. हा विराट कोहलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे.
ANGRY VIRAT KOHLI ON KIDS! Virat Kohli warned a few kids who were throwing bats onto the field to get his autograph during the ongoing match. https://t.co/Zp7g3tmevo
— Mukku (@Cric_Mukku) November 7, 2026
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये नुकताच एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला पण विराट कोहली या सामन्यामध्ये फार काही प्रभाव पाडू शकला नाही. विराट कोहली एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाला, त्याने या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 7 धावा केल्या आणि बाद झाला. या 7 धावांसह विराट कोहलीने रिकी पॅाटींगला मागे टाकले आहे. पाँटिंगचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला फक्त एका धावेची गरज होती. त्यानंतर कोहलीने दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून पाँटिंगला मागे टाकले.
हे ही वाचा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना हा 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे, न्यूझीलंडच्या संघासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. तर भारताच्या संघाला मालिकेमध्ये विजय मिळवण्याची संधी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या मालिकेमध्ये विजयाच्या उद्धेशाने मैदानात उतरतील.