SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'सुपरमॅन' फिन अ‍ॅलन! हवेत उडून रोखला षटकार, डेरिल मिचेलने पूर्ण केला भन्नाट कॅच

मधल्या फळीतील फलंदाज म्हणजेच वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे तीनही फलंदाज पूर्णपणे फेल झाले, या सामन्यातील अक्षर पटेलचा कॅच सध्या चर्चेत आहे. डॅरिल मिचेलने घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 24, 2026, 06:51 PM IST | Updated: Oct 24, 2026, 06:59 PM IST
Join

न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये भारताच्या संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या संघाने अनेक कॅच भारतीय फलंदाजांचे सोडले त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा झाला. भारताच्या संघाने पावर प्लेमध्ये तीन विकेट्स गमावले होते, पण सलामीवीर फलंदाजांनी या सामन्यामध्ये कमालीची सुरुवात करुन दिली पण त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज म्हणजेच वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे तीनही फलंदाज पूर्णपणे फेल झाले, या सामन्यातील अक्षर पटेलचा कॅच सध्या चर्चेत आहे.

भारतीय डावादरम्यान हे नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा अक्षर पटेल पुढे सरसावला आणि त्याने सँटनरच्या एका जोरदार चेंडूवर फटका मारला. चेंडू उंच उडाला आणि सहजपणे सीमारेषेबाहेर जाईल असे वाटत होते. मात्र, लॉन्ग ऑनला उभा असलेला फिन ॲलन हार मानण्याऐवजी, वेगाने चेंडूच्या दिशेने धावला. सीमारेषेच्या अगदी जवळ असलेल्या ॲलनने हवेत उडी मारून चेंडू पकडला. पण त्याच्यासमोर एक मोठे आव्हान होते. त्याचा तोल जात होता आणि तो सीमारेषेच्या पलीकडे जाणार होता. त्याने विलक्षण प्रसंगावधान दाखवले. चेंडू घेण्याऐवजी, त्याने तो परत मैदानात फेकला. जवळच असलेल्या डॅरिल मिचेलने योग्य वेळी चेंडू पकडला, या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

मालिकेच्या दुसऱ्या सामन्यातील अहवालाबद्दल सांगायचे झाले तर श्रेयस अय्यरने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या आणि 5 विकेट्स गमावले. प्रत्युत्तरात भारताच्या संघाने हे लक्ष 19.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले, या सामन्याचे मॅचविनर तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी हे ठरले आहेत. या सामन्यामध्ये तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. 

हे ही वाचा

तिलक-नितीशच्या जोडीने न्यूझीलंडकडून हिसकावला विजयाचा घास, टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय

तिलक वर्माने संघासाठी आजच्या सामन्यामध्ये 26 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा केल्या यामध्ये त्याने 1 षटकार आणि 6 चौकार मारले. तर नितीशने 13 चेंडूंमध्ये नाबाद २६26 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने 43 चेंडूंमध्ये शानदार 70 धावा करून डावाची धुरा सांभाळली. बेव्हॉन जेकब्सनेही 46 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES