• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /तिलक-नितीशच्या जोडीने न्यूझीलंडकडून हिसकावला विजयाचा घास, टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय

तिलक-नितीशच्या जोडीने न्यूझीलंडकडून हिसकावला विजयाचा घास, टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय

भारत न्यूझीलंड रोमांचक सामन्यात भारताच्या संघाने न्यूझीलंडचा विजयाचा घास हिसकावला आणि किवी संघाला 4 विकेट्सने पराभूत करुन 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 24, 2026, 03:54 PM IST|Updated: Oct 24, 2026, 04:38 PM IST
joinshare
तिलक-नितीशच्या जोडीने न्यूझीलंडकडून हिसकावला विजयाचा घास, टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिकेचा दुसरा रोमांचक सामना पार पडला, या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमध्ये शेवटच्या काही ओव्हरमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 4 विकेट्सने सामन्यात विजय मिळवला आहे.  या सामन्यामध्ये मैदानावर गोलंदाजांना मदत मिळाली. या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 108 धावा केल्या. या सामन्यात आणखी ग्लेन फिलिप्सने संघासाठी कमालीची कामगिरी केली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. या सामन्यात ग्लेन फिलिप्सने संघासाठी अर्धशतक झळकावले, फिलिप्सने 43 चेंडूंमध्ये 70 धावा आणि जेकब्सने 46 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. संघात दोन बदल करण्यात आले आहेत. वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव यांना संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात याच मैदानावर झालेल्या एका रोमांचक सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केले होते.

हे ही वाचा

टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा नवा विक्रम; एका वर्षात सर्वाधिक झेल घेणारा फील्डर

भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताचे दोन्ही सलामीवीर संजू आणि अभिषेकने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण सुरुवातीचे विकेट्स भारताच्या संघाने लवकर गमावले, आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीला देखील खेळण्याची संधी मिळाली होती. पण तो आजच्या सामन्यामध्ये फक्त 4 धावा करुन बाद झाला, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल देखील संघासाठी फार काही करु शकले नाही. त्यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर हे फलंदाजीला आले आणि त्यांनी संघासाठी चांगली भागीदारी केली, या सामन्यात सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि भारताने नमन धीरचा विकेट गमावला.

नमन धीरचा विकेट गेल्यानंतर तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कमालीची खेळी खेळल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने संघासाठी अर्धशतक झळकावत मॅचविनिंग खेळी खेळली. तिलक वर्माने संघासाठी 26 चेंडूमध्ये 51 नाबाद धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने 13 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये 3 गडी गमावले. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात टिम सेफर्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर भुवनेश्वर कुमारने डॅरिल मिचेलला बाद केले. प्रिन्स यादवने फिन ॲलनला क्लीन बोल्ड केले. ग्लेन फिलिप्स आणि जेकब्स यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Sports News