SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मेस्सी, एम्बाप्पेला मागे सोडून हॅरी केनने जिंकला बॅलोन डी'ओर पुरस्कार, एकत्र एवढे अवॉर्ड जिंकणारा पहिला खेळाडू

Harry Kane Wins Ballon dOr 2026 : इंग्लंडचा स्टार फुटबॉलर हॅरी केनने मेस्सी, एम्बाप्पेला मागे सोडून 2026 चा बॅरल डी ओर अवॉर्ड जिंकला आहे. यासह त्याने 'गर्ड मुलर ट्रॉफी' सुद्धा पटकावून एकाच समारंभात दोन वैयक्तिक पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 27, 2026, 02:30 PM IST | Updated: Oct 27, 2026, 03:01 PM IST
Image Credit: हॅरी केनने जिंकला बॅलोन डी'ओर पुरस्कार
Join

Harry Kane Wins Ballon dOr 2026 : इंग्लंडचा स्टार फुटबॉलर हॅरी केनने यावर्षी 2026 चा बॅरल डी ओर अवॉर्ड जिंकला आहे. हॅरी केनने केवळ हा पुरस्कारच जिंकला नाही, तर 'गर्ड मुलर ट्रॉफी' पटकावून इतिहासही घडवला. एकाच समारंभात दोन वैयक्तिक पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. हॅरी केनने या यशाचे श्रेय आपला माजी क्लब 'टोटेनहॅम' आणि पत्नी यांना दिले.

इंग्लंडचा 25 वर्षांचा इतिहास संपला :

हॅरी केनने बॅलन डी'ओर (Ballon d'Or) जिंकून इंग्लंडची 25 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. याआधी 2001 मध्ये मायकल ओवेनने हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतरच्या काळात इतर कोणत्याही इंग्लिश खेळाडूला हा बहुमान मिळवता आला नव्हता. केन हा पुरस्कार जिंकणारा पाचवा इंग्लिश खेळाडू ठरला असून, त्याने सर स्टॅनली मॅथ्यूज, सर बॉबी चार्लटन, केविन कीगन आणि मायकल ओवेन यांच्या रांगेत स्थान मिळवले आहे.

पत्नी आणि जुन्या क्लबचे मानले आभार :

बॅलन डी'ओर जिंकल्यानंतर हॅरी केनने आपला क्लब, टोटेनहॅम आणि आपल्या पत्नीचे आभार मानले. आपल्या भाषणात त्याने सांगितले की, टोटेनहॅमशिवाय तो आज ज्या स्थानावर आहे, तिथे पोहोचू शकला नसता. त्याने आपल्या पत्नीचे वर्णन बेस्ट फ्रेंड असे केले आणि सांगितले की, त्याच्यापेक्षाही जास्त उत्सुकता तिला या पुरस्काराची होती. तो म्हणाला 'आम्ही दोघांनी मिळून हे साध्य केले आहे'.

हेही वाचा : विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा होणार? मुंबईतील कार्यक्रमादरम्यान व्हायरल Photo मुळे चर्चेला उधाण

एकाचवेळी जिंकले 2 अवॉर्ड :

हॅरी केनने बॅलन डी'ओर सोबत गेर्ड मुलर ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. ही ट्रॉफी अशा खेळाडूला दिली जाते, जो युरोपियन फुटबॉल हंगामात क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करतो. हॅरी केनने 2024 मध्येही ही ट्रॉफी जिंकली होती, परंतु यावेळी 'बॅलन डी'ओर' सोबत ही ट्रॉफी जिंकणे ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे, असं करणारा तो पहिला खेळाडू आहे.

महिलांचा बॅलन डी'ओर पुरस्कार सुद्धा स्पेनकडे :

पुरुष विभागातून बॅलन डी'ओर हा हॅरी केनने जिंकला तर महिलांचा बॅलन डी'ओर हा पुरस्कार स्पेन एलेक्सिया पुटेलासच्या नावावर राहिला. बार्सिलोनाच्या या स्टार खेळाडूने तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकून विक्रमाशी बरोबरी केली आहे. तिला 2021 आणि 2022 मध्येही हा सन्मान मिळाला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES