SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'अंडर 19 आशिया कपमध्ये वयापेक्षा मोठे खेळाडू...'; पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक दावा, 'भारताने आक्रमक होणं म्हणजे...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने अंडर 19 आशिया कपमधील खेळाडूंबाबत धक्कादायक दावा केला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 20, 2026, 22:29 IST | Updated: Nov 20, 2026, 22:36 IST
Image Credit: पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक दावा
Join

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कानेरियाने अंडर 19 आशिया कपमधील खेळाडूंबाबत धक्कादायक दावा केला आहे. अंडर 19 आशिया कप खेळणारे काही पाकिस्तानी खेळाडू वयाने जास्त दिसत होते असं त्याचं म्हणणं आहे. अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत पाकिस्तानकडे विजेतेपद मिळवण्याची उत्तम संधी होती. परंतु मोहित उल्वा आणि मनाल चौहान यांनी 57 धावांची भागीदारी करत भारताला एका विकेटने विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला असताना, चौहानने 32 चेंडूंत 47 धावा केल्या, तर उल्वा 26 चेंडूंत 49 धावा करून नाबाद राहिला, ज्यामुळे भारताने एक ऐतिहासिक विजय नोंदवला.

दिनेश कनेरियाने म्हटलं की, फलंदाजी चांगली झाली असली तरी पाकिस्तानची गोलंदाजी आणि रणनीती अपेक्षापेक्षा कमी दर्जाची होती. अंतिम सामन्यात पाकिस्तानने चुकीच्या वेळी आक्रमकता दाखवली असंही त्यांचं म्हणणं आहे.

"मी त्यादिवशी सामन्याचे हायलाईट्स पाहत होतो. जेव्हा मी क्रिकेट पाहतो तेव्हा माझ्यासोबत आईदेखील पाहते. ती म्हणाली, भारतीय संघात किती मुलं खेळत आहेत. पण पाकिस्तानने अंडर-19 मध्ये आपला राष्ट्रीय संघ उतरवला आहे का? ते जरा वयाने जास्त वाटत आहेत. ते लहान दिसत नाहीयेत ना?," असं त्याने म्हटलं आहे.

हे ही वाचा - 'आपलीच इज्जत घालवून...', U19 वर्ल्डकपमधील भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा दिग्गज स्पष्टच बोलला, 'याला काय अर्थ...'

"पाकिस्तानच्या संघाला आणि त्यांच्या गोलंदाजीला नक्की काय झाले आहे, हे मला समजत नाही. क्रिकेटचा दर्जा खूपच खालावला आहे. मी आता सामने पाहणेही बंद केले आहे. मला ते पाहण्याची इच्छाच उरत नाही. हे कसले क्रिकेट आहे? अगदी 'अंडर-19' स्तरावरही भारताने अतिशय उत्तम खेळ केला. मला वाटते की, भारतात प्रतिभेचा ओघ सतत वाढत आहे. तिथे प्रचंड गुणवत्ता आहे. हे तरुण खेळाडू भविष्यात भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, मग गोलंदाज असो किंवा फलंदाज जे येणाऱ्या काळात भारताचे प्रतिनिधित्व करतील."

"भारताने विजयानंतर योग्य वेळी आक्रमकता दाखवली. पाकिस्तानने मात्र चुकीच्या वेळी, म्हणजेच सामना सुरू असतानाच आक्रमकता दर्शवली. त्यांनी जे काही केले, त्यावरून हेच ​​दिसते की, जर तुम्ही जिंकलात तरच आक्रमकता दाखवणे योग्य ठरते. त्यांनी 100 धावा केल्यानंतर किंवा इतर प्रसंगी जसे वर्तन केले, ते सर्वांनी पाहिलेच आहे. त्यांचे वागणे कसे होते? याउलट, भारताने विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिली," असं तो म्हणाला.

कानेरियाने असंही म्हटलं की, अंडर -19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताने केलेला जल्लोष पूर्णपणे समर्थनीय होता. त्याच्या मते, पाकिस्तानी खेळाडूंनी सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूंना चिथावणी दिली होती, त्यामुळे त्यांनाही तितक्याच आक्रमक प्रतिसादासाठी तयार असायला हवं होतं.

"दुसऱ्या बाजूने विचार केला तर, जर पाकिस्तान जिंकला असता, तर त्यांनीही अगदी असंच केलं असतं. त्यांनीही तितक्याच आक्रमकतेने जल्लोष केला असता. मग भारतीय मुलांनी असे केले, तर त्यात चुकीचे काय आहे? त्यांनी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. त्यांनी फक्त आपली आक्रमकता दर्शवली आहे. आयसीसीच्या (ICC) नियमावलीत कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही आक्रमकता दाखवू शकत नाही. तुम्ही ती दाखवू शकता, पण त्यासाठी एक ठराविक मर्यादा असते," असं तो म्हणाला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES