• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'आपलीच इज्जत घालवून...', U19 वर्ल्डकपमधील भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा दिग्गज स्पष्टच बोलला, 'याला काय अर्थ...'

'आपलीच इज्जत घालवून...', U19 वर्ल्डकपमधील भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा दिग्गज स्पष्टच बोलला, 'याला काय अर्थ...'

भारताने अंडर 19 आशिया कपमधील अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अविश्वसनीय पुनरागमन करत सामना जिंकला.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 15, 2026, 08:32 AM IST|Updated: Nov 15, 2026, 08:39 AM IST
joinshare
'आपलीच इज्जत घालवून...', U19 वर्ल्डकपमधील भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा दिग्गज स्पष्टच बोलला, 'याला काय अर्थ...'
Image Credit: भारताने अंडर 19 आशिया कपमधील अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अविश्वसनीय पुनरागमन करत सामना जिंकला

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अंडर 19 आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एक गडी राखून जबरदस्त विजयाची नोंद केली आहे. यासह भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारताच्या या विजयाचे धक्के सीमापार पाकिस्तानपर्यंत बसले आहेत. पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला असताना भारताची स्थिती एकावेळी 254 धावांवर 8 गडी बाद अशी होती. ओव्हरला दहाचा रन रेटची गरज आणि हातात फक्त दोन विकेट असताना भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत अंतिम सामना जिंकला आणि चषकावर नवव्यांदा भारताचं नाव कोरलं.

पाकिस्तानच्या पराभवानंतर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदने देशाच्या क्रिकेट प्रशासनावर जोरदार टीका केली. पाकिस्तानला अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला असून आता पाकिस्तानचे क्रिकेट भारतापेक्षा सरस आहे करणं थांबवा अशा शब्दांत सुनावलं आहे. तन्वीरने पराभवासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि व्यवस्थेला जबाबदार धरले.

तन्वीर अहमदने म्हटलं आहे की, पाकिस्तान ज्या पद्धतीने पराभूत झाला आहे, त्यानंतर दोन्ही संघांची तुलना करण्यात काहीही अर्थ उरत नाही. त्याच्या मते, पाकिस्तानची क्रिकेट व्यवस्था भारताच्या तुलनेत खूपच मागे आहे.

"(बेइज्जती हो गई ना? अच्छी-खासी बेइज्जती करवा ली ना? बेइज्जती तो होनी ही थी!) आपली फजिती झाली आहे. आपण भारतापेक्षा सरस आहोत, असं म्हणणं थांबवा. मी आज हे स्पष्ट सांगतोय की आपण शून्य आहोत, अगदी शून्य. भारताच्या तुलनेत आपली व्यवस्था काहीच नाही," असं तन्वीरने म्हटलं आहे.

 

𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀 𝗰𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝗱! 🏆🤩 India U19 celebrate with the #MensU19AsiaCup winners' trophy! 🥳 https://t.co/1JlSakLJoB

— BCCI (@BCCI) November 14, 2026

 

पाकिस्तानच्या या माजी वेगवान गोलंदाजाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही टीका केली. त्याने म्हटलं की, जेव्हा जेव्हा एखादा नवीन अध्यक्ष पदभार स्वीकारतो, तेव्हा तो आपल्या जवळच्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यावर भर देतो, ज्यामुळे अखेरीस संपूर्ण क्रिकेटचे नुकसान होते. "आमच्या बोर्डाने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण व्यवस्थाच नष्ट केली आहे. जो कोणी अध्यक्ष बनतो, तो आपल्या स्वतःच्या माणसांना सामावून घेण्याचा प्रयत्न करू लागतो," असा आरोप त्याने केला आहे.

तन्वीर अहमदने मान्य केलं की, भारतीय संघाने अशा सामन्यात विजय मिळवला जो त्यांच्या हातातून निसटून जात असल्याचे वाटत होते. त्याने विशेषतः मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांच्या भागीदारीचे कौतुक केले. भारतीय फलंदाजांनी सामन्याचे पारडे फिरवण्यापूर्वी पाकिस्तानचे खेळावर पूर्ण नियंत्रण होते असं त्याने सांगितलं.

पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने भारताचं पुनरागमन एखाद्या चमत्कारासारखं असल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानने 337 धावांचा मोठा डोंगर उभारला होता आणि भारताच्या शेवटच्या दोन विकेट्स शिल्लक असताना पाकिस्तान सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत होता.

"भारताने एक असा सामना जिंकला जो त्यांनी आधीच गमावला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 337 धावांचा मोठा डोंगर उभारला होता आणि भारताच्या केवळ दोन विकेट्स शिल्लक असतानाही सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात होता. मात्र, मोहित आणि मनाल चौहान यांनी ज्या पद्धतीने हा सामना पाकिस्तानच्या हातातून खेचून आणला, ते खरोखरच उत्कृष्ट होते," असे तो म्हणाला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Team india