गेल्या वर्षभरात आपण सोनं - चांदीच्या दरात मोठी चढ पाहिला मिळाली. सोनं - चांदीच्या दरात रोज कमी जास्त दर होता आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्या - चांदीत मोठी घसरण पाहिला मिळतेय. अशातच 12 रुपयाचं प्युअर सोनं, 15 रुपयाची चांदी मिळत आहे आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात ते खरेदी करत आहेत. एवढा कमी किंमतीत सोनं आणि चांदी कुठे मिळत आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर मग जाणून घेऊयात यामागील सत्य.
सोनं आणि चांदी हे आपल्याला दोन प्रकारे खरेदी करता येतं. एक म्हणजे फिजिकल आणि दुसरं आहे जे गेल्या काही वर्षांमध्ये अधिक प्रचित झालं ते म्हणजे डिजिटल. गेल्या काळात डिजिलट खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जेव्हापासून सोनं - चांदीचे ईटीएम मार्केट आलंय तेव्हापासून ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. एवढंच नाहीतर भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांचा कलही सोनं आणि चांदी एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)कडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एका अहवालानुसार एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) विक्रमी गुंतवणूक झाल्याचा आकडे समोर आले आहेत.
तुम्हाला जर 12 रुपयाचं प्युअर सोनं हवं असेल तर टाटा गोल्ड ईटीएफ, ग्रो गोल्ड ईटीएफ, एंजल वन गोल्ड ईटीएफ आणि डीएसपी गोल्ड ईटीएफ इथे उपलब्ध आहे. तर हेही जाणून घ्या की, सोन्याचा फिजिकल बाजारभाव प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹1.25 लाख आहे. तर एक ग्रॅम सोने अंदाजे ₹13,000 रुपयांमध्ये मिळत आहे. मात्र, गुंतवणूकदार ईटीएफच्या माध्यमातून फक्त ₹12 मध्ये सोने खरेदी करण्यावर भर देत आहेत. जेव्हा सोनं चांदी लाखांच्या घरात मिळत असेल तेव्हा सोने आणि चांदी ₹12-₹15 ला मिळत असेल, तर गुंतवणूकदार साहजिकच याकडे आकर्षित होणार यात काही शंका नाही.
तर चांदीबद्दल बोलायचं झालं तर टाटा सिल्व्हर ईटीएफ, ग्रो सिल्व्हर ईटीएफ, कोटक सिल्व्हर ईटीएफ, डीएसपी सिल्व्हर ईटीएफ आणि क्वांट सिल्व्हर ईटीएफ हे प्रति युनिट सुमारे ₹15 रुपयात मिळत आहे. तर तुम्हाला चांदी अजून स्वस्त हवी असेल तर अँगल वन सिल्व्हर ईटीएफचे एक युनिट ₹5 मध्ये मिळत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सोनं - चांदीचे दर लाखांच्या घरात असताना 12 ते 15 रुपयात सोनं - चांदी कशी मिळत आहे. तर हे गणित समजून घ्या, तज्ज्ञ सांगतात की, 12 रुपयाचा ETF, 100 रुपयाच्या ETF पेक्षा स्वस्त असतो. उदाहरणाद्वारे समजून घ्या बघा जर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,21,000 रुपये प्रति आहे तर त्या 0.001 ग्रॅम सोन्याचं मूल्य सुमारे 12 रुपये होतं. कोणत्याही ईटीएफची प्रति यूनिट किमत (NAV) यावर अवलंबून आहे. फंड हाऊसमध्ये एक यूनिट सोने वा चांदीची किती मात्रा (जसं की, 0.01 ग्रॅम वा 0.1 ग्रॅम) ने पाहिली जाते.