SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ODI मालिका संपली, टीम इंडिया आता पुढील सामना कधी आणि कुठे खेळणार? वाचा सविस्तर माहिती

आता एकदिवसीय मालिका झाल्यानंतर टीम इंडिया पुढील सामना कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार आहे यासंदर्भात सर्व माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळेल. एकदिवसीय आणि टी20 मालिका झाल्यानंतर टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना कसोटी क्रिकेटचा चस्का पाहायला मिळणार आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 15, 2026, 06:33 PM IST | Updated: Nov 15, 2026, 06:44 PM IST
Join

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे भारताच्या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टी20 मालिका न्यूझीलंडविरुद्ध 3-2 ने जिंकली. तर आज नुकतीच एकिदिवसीय मालिका संपली आहे या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन सामने शुभमन गिलच्या नेतृत्वात तर एक सामना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जिंकून मालिका नावावर केली आहे. आता एकदिवसीय मालिका झाल्यानंतर टीम इंडिया पुढील सामना कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार आहे यासंदर्भात सर्व माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळेल. एकदिवसीय आणि टी20 मालिका झाल्यानंतर टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना कसोटी क्रिकेटचा चस्का पाहायला मिळणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय आणि टी20 मालिका झाल्यानंतर आता कसोटी क्रिकेटचा संग्राम पाहायला मिळणार आहे. भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताचा संघ ही मालिका खेळेल, या मालिकेमध्ये भारतीय संघाचे अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडू संघामध्ये पुनरागमन करणार आहेत. जसप्रीत बुमराह, रिषभ पंत मागील काही काळापासून सातत्याने दुखापतीशी झुंजत आहेत त्यामुळे हे खेळाडू या मालिकेमध्ये पुनरागमन करु शकतात. भारताच्या संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या सामन्यामध्ये स्थान मिळवण्यासाठी ही मालिका जिंकणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा

टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाला हरवलं, भारताचा 22 धावांनी विजय!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा पहिला सामना हा 19 नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे. बेसिन रिझर्व्ह येथे या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे, भारतीय चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी पहाटे 3.30 वाजता उठावे लागणार आहे. पहिला सामना 19-23 नोव्हेंबर यादरम्यान पहिला सामना खेळवला जाईल. दुसरा मालिकेचा सामना हा हॅगली ओव्हल येथे खेळवला जाणार आहे, या सामन्याचे आयोजन 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील वेळेच्या फरकामुळे, भारतीय प्रेक्षकांना हा सामना पाहण्यासाठी लवकर उठावे लागेल. दोन्ही कसोटी सामन्यांची नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.00 वाजता होईल आणि पहिला चेंडू पहाटे 3.30 वाजता टाकला जाईल. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.00 वाजता सामने सुरू होतील.

टीव्हीवर थेट प्रक्षेपण: तुम्ही सोनी स्पोर्ट्स 1, सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी समालोचन) आणि इतर प्रादेशिक वाहिन्यांवर सामने थेट पाहू शकता.
मोबाईल आणि लॅपटॉपवर: डिजिटल प्लॅटफॉर्मवर, या मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES