गौतम गंभीरला नाही मिळालं त्याचं पहिलं प्रेम, 12 वीत असताना जे घडलं त्यामुळे आयुष्य बदललं
Gautam Gambhir : भारतीय पुरुष संघाचा हेड कोच असलेला गौतम गंभीरचा आज 45 वा वाढदिवस आहे. क्रिकेटमध्ये नावलौकीक कमावलेल्या गंभीरचं पहिलं प्रेम मात्र काही वेगळंच होतं. स्वतः त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
Gautam Gambhir : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हा 14 ऑक्टोबर 2026 रोजी 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौतम गंभीर हा मैदानात नेहमीच नावाप्रमाणे गंभीर आणि आत्मविश्वासू असतो. मात्र खूप कमी जणांना माहितीये की गौतम गंभीर आज एक मोठा क्रिकेटर असला तरी त्याचं पहिलं प्रेम मात्र अपूर्ण राहिलं. गौतम गंभीर हा बारावीत असताना घडलेल्या एका मोठ्या घटनेमुळे हे प्रेम त्याच्या हातातून निसटून गेलं. विशेष बाब म्हणजे गंभीर अजूनही आपल्या पहिल्या प्रेमाला विसरलेला नाही. गौतम गंभीरने स्वतः एका मुलाखतीत स्पष्ट केलं की त्याचं पहिलं प्रेम हे क्रिकेट नाही तर इंडियन आर्मी होतं. मात्र गौतम गंभीर 12 वी मध्ये असताना अशी काही घटना घडली ज्यामुळे तो त्याचं इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
गौतम गंभीरचं पहिलं प्रेम होतं इंडियन आर्मी :
भारतीय सैन्यात जायचं गौतम गंभीरचं स्वप्न होतं. जणू भारतीय सैन्यदल हे गंभीरचं पहिलं प्रेमच होतं. गंभीरने सांगितलं की क्रिकेट तर त्याच्या जीवनात नशिबाने आलं. भारतीय सैन्य हे त्याचे पहिले प्रेम होते, आहे आणि नेहमीच राहील. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत गंभीरने असेही म्हटले होते की भारतीय सैन्यात सामील होऊ न शकल्याची त्याला नेहमीच खंत वाटेल.
पण गौतम गंभीरला त्याचं पहिलं प्रेम म्हणजेच भारतीय सैन्यात दाखल होता का आलं नाही? याचं कारण सुद्धा त्यानेच सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला की 12वी मध्ये असताना तो रणजी ट्रॉफीचा सामना खेळला होता. गौतम गंभीर म्हणाला की त्याचं क्रिकेटमध्ये येणं हे पूर्णपणे नशिबावर अवलंबून आहे. गंभीर म्हणाला की, 'जर मी बारावीत असताना रणजी करंडक स्पर्धा खेळलो नसतो, तर मी नक्कीच एनडीए (NDA) म्हणजेच 'नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी'मध्ये सामील झालो असतो'.
मात्र गौतम गंभीर पुढे म्हणाला की, 'जे काही होतं ते चांगल्या साठीच होतं'. गौतम गंभीरला जरी त्याचं पहिलं प्रेम मिळालं नसलं तरी त्याच्या रूपाने भारतीय क्रिकेटला एक उत्कृष्ट क्रिकेटर मिळाला आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच पदावरून पायउतार झाल्यावर गौतम गंभीरची हेड कोचपदी निवड करण्यात आली. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्ड कप 2026 सुद्धा जिंकली आहे.