'मला कशाचीच भीती नाही....' पत्रकार परिषदेत गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला, नेमक्या कोणत्या प्रश्नावर भडकला?
Gautam Gambhir : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवण्यात आली. यात भारतीय संघाने 3-2 ने आघाडी घेत विजय मिळवला. हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देत असताना तो म्हणाला की , 'मला कशाचीच भीती नाही...'.
Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा हेड कोच असणाऱ्या गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 3-2 ने टी20 सीरिज जिंकली. सीरिज जिंकल्यावर गौतम गंभीर आत्मविश्वासाने भरलेला दिसला. त्याने सामना जिंकल्यावर पत्रकार परिषदेत खेळाडूंचं कौतुक केलं. गौतम गंभीरने मान्य केलं की त्यांच्यासमोर अनेक प्रकारची आव्हान होती. खेळाडू प्रवासामुळे आलेल्या थकव्यामुळे त्रस्त होते आणि परिस्थितीही वेगळी होती, तरीही त्यांनी मानसिकदृष्ट्या खंबीर राहून आपली आक्रमक शैली दाखवून दिली.
गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
जेव्हा गौतम गंभीरला पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आलं की, तो त्याच्याकडे येणाऱ्या आव्हानांमुळे त्रस्त आणि किंवा घाबरला आहे. तर याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, 'मला कशाचीही भीती वाटत नाही. माझ्या आयुष्यात भीतीला स्थान नाही हा शब्द माझ्या शब्दसंग्रहात किंवा माझ्या विचारपद्धतीत कोठेही नाही. आम्ही व्यावसायिक आहोत. माझी नेहमीच अशी धारणा राहिली आहे की, कोणत्याही सबबी स्वीकारल्या जाणार नाहीत'.
पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या आणि वर्कलोड मॅनेजमेंटबाबत भाष्य केलं. त्याने म्हंटलं की, 'माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल, ती मी सर्वोत्तम पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आमचे ध्येय सातत्याने चांगली कामगिरी करणे आणि संघ तसेच देशासाठी सातत्याने उत्तम परिणाम मिळवून देणे हे आहे'.
गौतम गंभीरने लागोपाठ झालेल्या क्रिकेट आणि व्यस्त शेड्युलवर चर्चा केली. याबाबत त्याने म्हटलं की, 'मला माहीत आहे की हे खूप कठीण आहे, पण मी याचा आनंद घेत आहे, कारण टीम इंडियाची जर्सी दुसऱ्यांदा परिधान करण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते'.
हेही वाचा : CSK ने 90 धावांची खर्च केले 14.20 कोटी, आता IPL 2027 पूर्वी संघातून रिलीज करणार 'हा' खेळाडू
भारताने 3-2 ने जिंकली टी20 सीरीज :
न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची सीरीज टीम इंडियाने 3-2 ने आपल्या नावावर केली. सीरिजच्या सुरुवातीला तीन सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. जरी टीम इंडियाला शेवटच्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, तरी त्यांनी न्यूझीलंडला जोरदार टक्कर दिली. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जाणार असून, तिची सुरुवात 4 नोव्हेंबरपासून होईल.