बॅालिवूडचा अभिनेता गोविंदा मागील काही काळापासून त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने मिडीयासमोर अनेकदा अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर अनेकदा गोविंदाने देखील मिडीयासमोर उघडपणे या मुद्द्यावर वक्तवे केली आहेत. मागील काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन करत आहे, या सिनेमामधील अभिनेत्रीशी त्याचे संबंध असल्याचेही त्याची पत्नी सुनीता अहुजाने आरोप केले होते. जवळपास चाळीस वर्षांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या आता केवळ अफवा राहिलेल्या नाहीत, दोघांनीही उघडपणे सांगितले आहे. पण आता अभिनेता गोविंदाच्या नव्या वक्तव्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
मागील काही दिवसांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांचे नाते चर्चेत आहे, आता गोविंदाने पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक जीवनावर भाष्य केले आहे. गोविंदाला विचारण्यात आले, "कोणामुळे आणि केव्हा तुमचे सुनिताजींसोबतचे संबंध बिघडायला लागले?" यावर गोविंदाने वादग्रस्त विधान केले आहे आणि त्यांचे नाते पुन्हा चर्चेत आले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, "लोक तुमचे नशीब चोरण्यासाठी तुमची स्त्री चोरतात." गोविंदाला या प्रतिक्रियेवर विचारण्यात आले की त्यांची पत्नी कोणी चोरली, यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि त्याने यावेळी फक्त हात जोडले.
हे ही वाचा
मुलाखतीमध्ये त्याला विचारण्यात आले की, जे लोक दुसऱ्यांची घरे उद्ध्वस्त करतात त्यांनी पुढे यावे. यावर बोलताना गोविंदा म्हणाला की, जे लोक असे कृत्य करत आहेत त्या लोकांना मी फरफटत नेईल आणि माझ्या बुटाने त्यांना चोप देईल असे त्याने स्पष्ट सांगितले. गोविंदाच्या या स्पष्टवक्त्या वक्तव्यांमुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गोविंदाने या केलेल्या वक्तव्यावरुन त्याने कोणावर निशाणा साधला आहे यावर सर्वाचे लक्ष आहे. गोविंदाने कोणाचेही नाव न घेता ही टीका केली आहे.
सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ गोविंदाचे आणि त्याची पत्नी सुनीता अहुजाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, सुनीता आहुजा यांनी गोविंदासोबतच्या आपल्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जो आनंद त्या 40 वर्षांत देऊ शकल्या नाहीत, तो आनंद आता गोविंदाला मिळत आहे. सुनीता म्हणाल्या, "दुसरी कोणीतरी त्याला तो आनंद देत आहे. देव त्याचे भले करो, तो सुखी राहो." मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही किंवा कोणताही थेट दावा केला नाही.