SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गुरनूर ब्रार विरुद्ध न्यूझीलंडचा फलंदाज, मैदानावरच एकमेकांशी भिडले! पहा Video

टीम इंडियाचा गोलंदाज गुरनुर ब्रारने संघासाठी तीन विकेट्स घेतले, त्याच्या या प्रभावी कामगिरीच्या दरम्यान सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तो न्यूझीलंडच्या फलंदाजाशी वाद घालताना दिसत आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 04, 2026, 06:26 PM IST | Updated: Nov 04, 2026, 07:01 PM IST
Join

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना आज पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. टीम इंडियाचा गोलंदाज गुरनुर ब्रारने संघासाठी तीन विकेट्स घेतले, त्याच्या या प्रभावी कामगिरीच्या दरम्यान सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तो न्यूझीलंडच्या फलंदाजाशी वाद घालताना दिसत आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजाला टीम इंडियाचा गोलंदाज सामन्यादरम्यान फलंदाजीचा सल्ला देताना दिसला नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताच्या विजयासोबतच एक मजेशीर प्रसंगही घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रार आणि न्यूझीलंडचा फलंदाज ब्लेअर टिकनर यांच्यातील मैदानावरच्या शाब्दिक चकमकीने सर्वांची मने जिंकली. न्यूझीलंडच्या डावाच्या 40 व्या ओव्हरमध्ये हा गमतीशीर प्रसंग घडला. भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार किवी फलंदाज ब्लेअर टिकनरला एकापाठोपाठ एक आखूड चेंडू टाकून त्याची परीक्षा घेत होता. पहिल्याच चेंडूवर जेव्हा टिकनरचा पुल शॉट चुकला, तेव्हा त्याने एक अतिशय मनोरंजक आणि विनोदी युक्ती अवलंबली.

हे ही वाचा

ODI मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात, कोहलीने ठोकले अर्धशतक! 

जेव्हा टिकनरचा पुल शॉट चुकला त्यानंतर गुरनूरने त्याच्याकडे पाहून, फलंदाजी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असल्यासारखे काहीतरी म्हटले. टिकनरने प्रत्युत्तर दिले आणि दोघांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, पुढच्याच चेंडूवर गुरनूरने आपले कौशल्य दाखवले. त्याने टिकनरला बाद करून सामन्यातील आपली तिसरी विकेट मिळवली. अशाप्रकारे, एका जोरदार वादानंतर, या भारतीय गोलंदाजाने मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. हा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी केली पण संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी पडला. न्यूझीलंडच्या संघ 185 धावांवर सर्वबाद झाला, भारताच्या संघाला डीएलएस मेथडनुसार 5 विकेट्सने विजयी घोषित करण्यात आले. या विजयासह भारताच्या संघाने या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना हा 7 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES