ठरलं! हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडली, आता 'या' टीमकडून खेळणार, ट्रेडमध्ये मुंबईला मिळाला स्टार गोलंदाज
सलग दोन वर्ष मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषावलेल्या हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यात आले आहे. आता तो पंजाब किंग्ससोबत दिसणार आहे.
आयपीएलच्या आगानी 20 व्या सिझनसाठी काहीच दिवसांत ऑक्शन होणार आहे. लिलावाआधीच मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सच्या खेळाडूंमध्ये सहमतीने अदला-बदली (ट्रेड) करण्यात आली आहे. यात स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये दिसणार आहे. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. सध्या हा बदल प्रस्तावित असून याला बीसीसीआयकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
आयपील सूत्रानुसार, श्रेयस अय्यर हा पंजाब किंग्सचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास हार्दिक तयार असल्याचे समजतंय. अर्शदीपच्या बदली हार्दिकला ट्रेड करण्याचा निर्णय कर्णधार आणि कोच यांचा होता. अर्शदीप दीर्घ काळापासून पंजाब किंग्ससोबत खेळत होता. तर, याकाळात त्याने चांगली कामगिरी देखील केली होती. अर्शदीपला ट्रेड करण्याचा निर्णय घेणे टीमसाठी अवघड होतं. कारण अर्शदीपने सातत्याने टीमसाठी चांगलं खेळत होता.
श्रेयस अय्यर कर्णधार राहणार का?
श्रेयस अय्यरने 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहोचवले होते. 2026 च्या सिझनमध्ये संघाला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिल्याने ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नाहीत. असे असूनही, श्रेयसने कर्णधार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणारा आणि मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवलेला हार्दिक पांड्या, जर श्रेयसच्या नेतृत्वाखाली एकत्र संघात आला, तर त्याची भूमिका काय असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
कर्णधार आणि कोच यांनी हा निर्णय घेतला होता. तर, आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या ट्रेडनुसार आता मुंबई इंडियन्ससोबतचा हार्दिकचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. हार्दिकने 2024मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर दीर्घ काळापासून मुंबई इंडियन्ससची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिकला कर्णधार करण्यात आले होते.
इतकंच नव्हे तर, आयपीएलच्या ऑक्शनच्या आधी पंजाब किंग्सचे मार्कस स्टोइनिस आणि नेहाल वढेरा यांनाही टीम रिलीज करू शकते.
अर्शदीप सिंह किती सामने खेळला?
दरम्यान, अर्शदीप सिंह याला पंजाब किंग्सकडूनच आयपीएलमध्ये एन्ट्री मिळाली होती. अर्शदीप 2019 मध्ये पहिला सामना खेळला. अर्शदीपने त्याच्या आयपीए कारकीर्दीत 19 व्या हंगामापर्यंत 96 सामने खेळले आहेत. अर्शदीपने या 96 सामन्यांत 11 विकेट्स मिळवल्या आहेत.