WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती विजयाची गरज? वाचा संपूर्ण समीकरण
आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या संघाला किती विजयाची गरज आहे, गुणतालिकेचे समीकरण काय यासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.
भारतीय संघाची कसोटी मालिका काही तासांमध्ये सुरु होणार आहे, न्यूझीलंडविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत टीम इंडियासमोर मोठे आव्हान असणार आहे. भारताच्या संघाला या उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाची आगामी काही कसोटी सामने करो या मरो असणार आहे. टीम इंडियाला कसोटी सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे, आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी किती विजयाची गरज आहे, गुणतालिकेचे समीकरण काय यासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.
2025-27 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रात टीम इंडियाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही, त्यामुळे आता भारताच्या संघासाठी आगामी सामने हे महत्त्वाचे असणार आहेत. टीम इंडियाने काही मोठ्या मालिका गमावल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा अंतिम सामन्यापर्यंतचा मार्ग काहीसा कठीण झाला आहे. तथापि, सध्याच्या डब्ल्यूटीसी चक्रात त्यांचे अजून सात सामने शिल्लक आहेत आणि ते अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित करू शकतात. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी कसोटी मालिका टीम इंडियाचे भविष्य ठरवेल.
हे ही वाचा
सामन्याची वेळ बदलली, चाहत्यांना झोप मोड करावी लागणार! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming?
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात भारतीय संघाचे अजून सात सामने बाकी आहेत आणि जर त्यांनी हे सर्व सामने जिंकले, तर त्यांना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. जरी भारतीय संघाने सातपैकी सहा सामने जिंकले, तरीही त्यांना डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी असेल. मात्र, जर भारतीय संघ दोन सामने हरला, तर भारताला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारतातच आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करू शकतो, पण त्याआधी न्यूझीलंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिकाच भारतीय संघाचे भवितव्य ठरवेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर न्यूझीलंडचा संघ सध्या कसोटी गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे त्याचे 72.22 गुण आहेत तर दक्षिण आफ्रिका 71.43 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या गुणातिलेमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलियाचे सध्या 69.23 गुण आहेत. भारताचा संघ 51.52 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.