टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण
WTC Final Qualification For Team India : कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाचव्या दिवशी हातात आलेला पहिला टेस्ट सामना गमावला आणि अखेर तो ड्रॉ झाला. यामुळे भारताच्या WTC पॉईंट्स टेबलवरील टक्केवारीवर परिणाम झाला असून यानंतर टीम इंडिया WTC Final मध्ये कशी पोहोचू शकते याविषयी जाणून घेऊयात.
WTC Final Qualification For Team India : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमधील पहिला सामना पार पडला. सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी सामना टाय झाला आणि त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाण्याचे भारताचे गणित कठीण झाल्याचं बोललं जातं आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाचव्या दिवशी हातात आलेला सामना गमावला आणि परिणामी तो ड्रॉ झाला. मात्र अजूनही भारताला WTC Final मध्ये पोहोचण्याची संधी आहे.
सध्या चौथ्या स्थानावर भारत :
सामना ड्रॉ झाल्यावर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत 50 टक्के पॉईंट्सने चौथ्या क्रमांकावर आहे. दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजपूर्वी भारताचे पॉईंट्स 51.52 टक्के इतके होते. सध्याच्या WTC सायकल (2024-27) मध्ये भारताला अजून सहा टेस्ट सामने खेळायचे आहेत. एक सामना क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध, आणि पाच सामने जानेवारी फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळायचे आहेत.
भारताला सहा टेस्ट अजून खेळायचेत :
पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका 75 टक्के पॉईंट्ससह प्रथम स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 69.23 टक्के पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड 66.67 पॉईंट्स सह तिसऱ्या स्थानी आहे. अशा स्थितीत जर भारताला अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सहाही टेस्ट सामने जिंकणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांची गुण टक्केवारी 66.67 वर पोहोचेल. मात्र असं झालं तरी सहाही टेस्ट सामने जिंकूनही भारत पहिल्या दोन संघांच्या मागे राहू शकतो. अशा वेळी त्यांना इतर संघांच्या खराब कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, नेमकं काय करतो माहितीये का?
फक्त विजयचं महत्वाचा नाही तर... :
टीम इंडिया जर सहा टेस्ट सामन्यांपैकी जर पाच सामने जिंकते आणि एक सामना ड्रॉव झाला तर त्यांची टक्केवारी 62.96 एवढी असेल, तर पाच विजय आणि एक पराभवाच्या स्थितीमध्ये हा ही टक्केवारी कमी होऊन 61.11 एवढी राहील. अशा परिस्थितीत अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताकडे एकच मार्ग आहे. तो म्हणजे उर्वरित सहाही सामने जिंकणे. याव्यतिरिक्त आगामी महिन्यांत इतर संघांच्या सामन्यांचे निकाल भारताच्या बाजूने लागतील अशी अपेक्षाही त्यांना ठेवावी लागेल.