SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वर्ल्ड कप फायनलच्या तिकिटांपेक्षा IND vs PAK सामन्याला जास्त मागणी, ICC कडे आली 8.4 मिलियन तिकिटांसाठी रिक्वेस्ट

ICC ODI World Cup 2027 Ticket : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या माहितीनुसार पुढील वर्षी 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधील भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची डिमांड खूप वाढली आहे. 34 हजार सीट्ससाठी जवळपास 8.4 मिलियन तिकिटांसाठी रिक्वेस्ट आली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 06:57 PM IST | Updated: Nov 03, 2026, 07:26 PM IST
Image Credit: वर्ल्ड कप फायनलच्या तिकिटांपेक्षा IND vs PAK सामन्याला जास्त मागणी
Join

ICC ODI World Cup 2027 Ticket : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्याची क्रेज पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ १० ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहेत. मात्र या सामन्याला पाहण्यासाठी आतापासूनच तिकिटांची जबरदस्त मागणी सुरु झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या नुसार या सामन्यात तिकिटांसाठी जवळपास 84 लाख रिक्वेस्ट आलेल्या आहेत. खास गोष्टी अशी की वर्ल्ड कप फायनल सामन्यासाठी सुद्धा त्याच्या त्यापेक्षा कमी रिक्वेस्ट आलेल्या आहेत.

काही हजार सीट्ससाठी लाखो रिक्वेस्ट :

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियममध्ये सुमारे 34000 प्रेक्षक बसू शकतात, परंतु तिकिटांसाठी 84 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. याचा अर्थ असा की, सामना पाहू इच्छिणाऱ्या लोकांची संख्या स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कपच्या अंतिम सामनाही याच मैदानावर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी सुमारे 80 लाख तिकिटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आयसीसीच्या माहितीनुसार सुमारे 193 देशांतील चाहत्यांनी तिकिटांसाठी अर्ज केले आहेत. संपूर्ण स्पर्धेसाठी आतापर्यंत 12 कोटींहून अधिक तिकिटांच्या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. तिकीट अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

हेही वाचा : सूर्यकुमार यादव KKR मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब
 

वर्ल्ड कपमध्ये एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकतात भारत - पाक सामने :

वर्ल्ड कप 2027 मध्ये दोन्ही संघ हे एकापेक्षा जास्तवेळा समोरासमोर येऊ शकतात. ग्रुप स्टेजमध्ये १० ऑक्टोबर रोजी भारत - पाक सामना होणार आहे. याशिवाय जर भारत आणि पाकिस्तान 'सुपर 7' टप्प्यात पोहोचले, तर तिथे त्यांच्यात दुसऱ्यांदा सामना होऊ शकतो. इतकेच नाही तर दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचले, तर तिसऱ्यांदा आमनेसामने येण्याची संधीही निर्माण होईल. थोडक्यात सांगायचे तर या स्पर्धेत चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकापेक्षा जास्त सामने पाहायला मिळू शकतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES