सकाळी किती वाजता सुरु होणार IND VS NZ दुसरा टेस्ट सामना? कुठे पाहता येणार?
IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टेस्ट सामना हा 27 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. तेव्हा हा सामना कधी सुरु होणार आणि कुठे पाहता येणार याचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊयात.
IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा 27 नोव्हेंबर शुक्रवार पासून खेळवला जाणार आहे. क्राइस्टचर्चच्या हेगली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून हा सामना सीरिज जिंकण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. सीरिजमधील पहिला टेस्ट सामना हा ड्रॉ झाला होता, त्यामुळे टेस्ट सीरिज सध्या 0-0 वर आहे. मात्र ही टेस्ट सीरिज न्यूझीलंडमध्ये खेळवली जात असल्याने भारतीय प्रेक्षकांना टेस्ट सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार नेमका किती वाजता सुरु होणार याविषयी थोडा गोंधळ आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 3:30 सुरु झाला होता. ज्यामुळे अनेक फॅन्स पहिला सेशन पाहू शकले नाहीत. आता ज्या ठिकाणी क्राइस्टचर्चच्या हेगली स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामना पार पडणार आहे. तेथील वेळ हा भारतापेक्षा 10 तासांनी पुढे आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टेस्ट सामन्याचा टॉस हा 27 नोव्हेंबर रोजी सकाळी ३ वाजता होईल तर पाचही दिवस सकाळी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टेस्ट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट हे भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग हे सोनी लिव्ह अँप आणि वेबसाईटवर पाहता येईल.
हेही वाचा : अजून एका मुंबईकराचं टीम इंडियात पदार्पण, आशिया कप सेमी फायनल सामन्यात मिळाली संधी
भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार ), केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, अंशुल कंबोज, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर बरार.
न्यूझीलंडचा संघ :
टॉम लॅथम (कर्णधार ), डेवोन कॉनवे, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, जॅकब डफी, मैट हेनरी, विल यंग, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), काइल जॅमीसन, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, नेथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट.