SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, किती वाजता सुरु होणार सामना? पाहा संपूर्ण डिटेल्स

India VS New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदलणार आहे. आतापर्यंत पाच सामन्यांच्या सीरिजमधील पहिले दोन सामने हे क्राइस्टचर्च येथे खेळवले गेले. मात्र तिसरा सामना हा वेगळ्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 25, 2026, 08:00 PM IST | Updated: Oct 25, 2026, 08:44 PM IST
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, किती वाजता सुरु होणार सामना? पाहा संपूर्ण डिटेल्स
Join

India VS New Zealand : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. येथे पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात असून यातील येथील दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला त्यामुळे सीरिज टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे, असं असतानाच आता तिसरा सामना हा अत्यंत निर्णायक ठरेल. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर ते सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतील तसेच जर न्यूझीलंडने विजय मिळवला तर ते सीरिजमध्ये पुनरागमन करतील. आतापर्यंत झालेले दोन सामने हे क्राइस्टचर्च येथे खेळवले गेले. मात्र आता तिसऱ्या टी20 सामन्यातील ठिकाण बदलणार आहे.

तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं :

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेले पहिले सामने हे क्राइस्टचर्च मध्ये झाले होते. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन केलं. सीरिजमध्ये पहिल्या टी20 सामन्यात भारताने उत्कृष्ट कामगिरी करत चार विकेट राखून रोमांचक विजय मिळवला. ख्राइस्टचर्चमधील त्याच मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातही चित्र तेच राहिले आणि भारतीय संघाने पुन्हा एकदा चार विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. सलग दोन विजयांसह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-0 अशी भक्कम आणि महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

आता भारत आणि न्यूझीलंड संघ तिसऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. ज्यासाठी आता ठिकाणात बदल झालेला असून टी20 सामना वेलिंगटनच्या हेनरी स्टेडियमवर होणार आहे. ठिकाणातील या बदलामुळे दोन्ही संघांसमोर नवीन आव्हानं आणि नवीन समीकरण निर्माण झाली आहे. क्राइस्टचर्चमधील वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर, आता खेळाडूंना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानाची खेळपट्टी, हवामान आणि एकूण स्वरूप लक्षात घेऊन आपल्या रणनीतीत पुन्हा बदल करावे लागतील.

हेही वाचा : सलग दुसऱ्या विजयानंतर 'या' 3 खेळाडूंचा फॅन झाला हेड कोच गौतम गंभीर, तीन शब्दात केली पोस्ट

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी20 सामना हा मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला दुपारी 12:30 वाजता सुरु होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सीरिजचं वेळापत्रक :

भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना - 27ऑक्टोबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना - 30 ऑक्टोबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना - 1 नोव्हेंबर

भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा (उपकर्णधार कर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण कुमार, वरूण कुमार, अभिषेक शर्मा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES