SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात घडला मोठा अपघात, चालू सामन्यात एकाचा जीव जाताजाता राहिला

IND VS NZ : 27 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलने एक शॉट खेळला. मात्र हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या ग्राउंड मॅनला लागण्यापासून जरासा राहिला अन्यथा त्याला गंभीर दुखापत झाली असती.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 27, 2026, 03:04 PM IST | Updated: Oct 27, 2026, 03:45 PM IST
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात घडला मोठा अपघात, चालू सामन्यात एकाचा जीव जाताजाता राहिला
Join

IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात आहे. यातील तिसरा सामना हा 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जात असून या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलने एक शॉट खेळला ज्यात त्याला 6 धावा मिळाल्या. मात्र हा शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या ग्राउंड मॅनला लागतालागता राहिला. या जोरदार फटक्यामुळे त्या ग्राउंड मॅनला गंभीर दुखापत झाली असती, मात्र तो सुदैवाने बचावला. डॅरिल मिचेलला सुद्धा याची जाणीव झाली.  म्हणूनच फटका मारल्यानंतर त्याने आपले डोळे मिटून घेतले. चालू सामन्यात एक मोठा अपघात थोडक्यात टळला होता. 

डॅरेल मिचेलने मारलेल्या सिक्समुळे गेला असता जीव :

वेलिंग्टनच्या मैदानावर डॅरिल मिचेल आणि फिन ॲलन यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत काही दर्जेदार फटके मारले. मात्र मिचेलच्याच एका फटक्याने त्याला थक्क करून सोडले. सहाव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर मिचेलने एक 'पुल शॉट' खेळला. बॉल अगदी सरळ रेषेत वेगाने गेला आणि बाउंड्रीच्या जवळ उभे असलेल्या ग्राउंड मॅनला लागण्यापासून थोडक्यात वाचला. ग्राउंड मॅन (स्टुअर्ड) प्रेक्षकांच्या दिशेने पाहत होता. जर बॉल त्याच्या डोक्याच्या मागील भागाला लागला असता, तर तो गंभीर जखमी होऊ शकला असता किंवा कदाचित त्याचा मृत्यूही ओढवू शकला असता. याची जाणीव मिचेलला होती आणि त्याने आपला चेहरा झाकून घेतला. बॉल लागल्यास काय परिणाम होऊ शकले असते, याची त्याला पूर्ण जाणीव होती.

हेही वाचा : विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा होणार? मुंबईतील कार्यक्रमादरम्यान व्हायरल Photo मुळे चर्चेला उधाण

न्यूझीलंडने विजयासाठी दिलं 199 धावांचं आव्हान :

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 27 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडला आधी फलंदाजी साठी मैदानात यावं लागलं. न्यूझीलंडने विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं.

भारताची प्लेईंग 11 : संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीशकुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, राजकुमार यादव

न्यूझीलंडची प्लेईंग 11 : टिम सायफर्ट (विकेटकिपर), फिन ॲलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवॉन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काईल जेमिसन, ॲडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES