भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
IND VS NZ ODI 2nd Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिजमधील दुसरा सामना हा 7 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तेव्हा हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता पाहायला मिळेल याविषयी माहिती जाणून घेऊयात.
IND VS NZ ODI 2nd Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना हा 4 नोव्हेंबर रोजी ऑकलँड येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड भारताची ही आघाडी मोडीत काढून बरोबरी साधते की भारतीय संघ सामना जिंकून आपली आघाडी अधिक मजबूत करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेव्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना, कुठे, कधी आणि केव्हा खेळवला जाईल आणि सुरु होईल याबाबतचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊयात.
पहिल्या वनडे सामन्यात काय घडलं?
पहिल्या वनडे सामन्यात भारताची गोलंदाजी उत्कृष्ट होती. अंशुल कंबोजने आपल्या 10 ओव्हर केवळ 22 धावा देऊन 2 विकेट मिळवले, ज्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच एक विकेट मिळवून न्यूझीलंडला धक्का दिला. मात्र तो या सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाजही ठरला. तर फलंदाजीत विराट कोहलीने अर्धशतक झळकावले, तर शुभमन गिलने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली.
भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, आकिब नबी, अंशुल कंबोज, गुरनूर बरार.
न्यूझीलंड संघ :
मिचेल सँटनर (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेवोन कॉनवे, डेरिल मिशेल, हेनरी निकोल्स, जॅकब डफी, मैट हेनरी, विल यंग, माइकल ब्रेसवेल, काइल जेमीसन, टिम सीफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, ब्लेयर टिकनर, नेथन स्मिथ, मॅथ्यू फिशर.
हेही वाचा : दिल्लीच्या वायुप्रदूषणा समोर BCCI ही नमलं, भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्याचं ठिकाण बदललं
दुसरा वनडे सामना कधी?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वनडे शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावर्षी दिवाळी रविवारी 8 नोव्हेंबर रोजी आहे. त्यापूर्वी हा सामना खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे वेलिंग्टनच्या वेलिंग्टन रीजनल स्टेडियमवर खेळवला जाईल.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता या सामन्याचा टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि वेबसाईट तसेच अँपवर सोनी लिव्ह अँपवर पाहता येईल.