SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'माझा किंग न्यूझीलंडला आला', विराट कोहलीला पाहून महिला चाहतीला आनंद आवरेना, उत्साहाच्या भरात केलं असं काही

India VS New Zealand : 4 नोव्हेंबर सुरु होणाऱ्या या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजसाठी विराट कोहली हा शुक्रवारीच न्यूझीलंडला पोहोचला. मात्र यावेळी एक चाहती विराट कोहलीला पाहून बेभान झाली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 30, 2026, 08:29 PM IST | Updated: Oct 30, 2026, 09:23 PM IST
Image Credit: 'माझा किंग न्यूझीलंडला आला', विराट कोहलीला पाहून महिला चाहतीला आनंद आवरेना, उत्साहाच्या भरात केलं असं काही
Join

India VS New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी20 सीरिजनंतर आता दोन्ही संघांमध्ये आगामी दिवसात वनडे आणि टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. या वनडे सीरिजमध्ये भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली असे दोन दिग्गज खेळणार आहेत. 4 नोव्हेंबर सुरु होणाऱ्या या वनडे सीरिजसाठी विराट कोहली हा शुक्रवारीच न्यूझीलंडला पोहोचला. यावेळी विराटचं एअरपोर्टवर जंगी स्वागत झालं. मात्र एक चाहती विराट कोहलीला पाहून बेभान झाली. विराटला प्रत्यक्ष पाहून तिला आनंद गगनात मावेनासा झाला. सध्या तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी पोहोचले फॅन्स :

न्यूझीलंडच्या एअरपोर्टवर विराट कोहलीचे फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी विराटने सुद्धा हात हलवून सर्वांचे अभिवादन केले. या दरम्यान विराट कोहलीला पाहून एक महिला चाहतीचा संयम सुटला आणि ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. तिने विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो असणारं पोस्टर हातात धरलं होतं आणि त्यावर विराटने ऑटोग्राफ द्यावा असा तिचा हट्ट होता. ती तो पोस्टर घेऊन सारखी विराट समोर जाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिला दूर करण्यासाठी सुरक्षाकर्मीना खूप कसरत करावी लागली. अखेर तिने विराटचा ऑटोग्राफ तीन आणलेल्या पोस्टरवर घेतला.

विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म :

विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील वनडे सीरिजमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर तो आता न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने केवळ 88 बॉलमध्ये 139 धावांची धडाकेबाज नाबाद खेळी साकारली होती. या शानदार खेळीदरम्यान, त्याने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. असा पराक्रम करणारा तो दिग्गज सचिन तेंडुलकरनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिज वेळापत्रक :

भारत विरुद्ध न्यूझीलंड : पहिला सामना : 4 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड : दुसरा सामना : 7 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड : तिसरा सामना : 10 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड : चौथा सामना : 13 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड : पाचवा सामना : 15 नोव्हेंबर 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES