SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टीम इंडियासाठी गुडन्यूज! फिट झाला स्टार गोलंदाज, लवकरच न्यूझीलंडसाठी निघणार

IND VS NZ : भारताचा स्टार गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा पुन्हा मैदानावर पुनरागमनासाठी सज्ज झालेला आहे. टेस्ट, वनडे आणि टी20 अशा तीन वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी त्याला फिट घोषित करण्यात आलं असून तो लवकरच मैदानात उतरू शकतो.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 07:37 PM IST | Updated: Nov 03, 2026, 08:15 PM IST
Image Credit: टीम इंडियाचा स्टार गोलंदाजाच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट
Join

IND VS NZ : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला बीसीसीआयच्या सेंटर एक्सीलेंसमधून फिट घोषित करण्यात आलं आहे. बंगळुरूमध्ये 1 आणि 2 नोव्हेंबरमध्ये झालेल्या सामन्याच्या सिम्युलेशन टेस्टमध्ये यशस्वी झाल्यावर प्रसिद्ध कृष्णाला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी परवानगी दिली आहे. टेस्ट, वनडे आणि टी20 अशा तीन वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी त्याला फिट घोषित करण्यात आलं आहे.

फिट असूनही खेळणार नाही वनडे सीरिज :

पूर्णपणे तंदुरुस्त असूनही भारत विरुद्ध न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार नाही ही सीरिज 4 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. प्रसिद्ध कृष्णा हा लवकरच न्यूझीलंडला रवाना होऊ शकतो, जिथे 7 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम अनोफिशिअल टेस्ट सामन्यात खेळण्याचा त्याचा मानस आहे.

प्रसिद्ध कृष्णाला 30 सप्टेंबर रोजी वेस्टइंडीज विरुद्ध गुवाहाटी सामन्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान त्याला दुखापत झाली होती. तो या सामन्यात फक्त 5 ओव्हर गोलंदाजी करू शकला. त्यानंतर तो मैदानाच्या बाहेर पडला. आता त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झालेली आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार यादव KKR मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब
 

इंडिया अ सामन्यात करू शकतो पुनरागमन :

प्रसिद्धला न्यूझीलंड विरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या सीरिजच्या सुरुवातीला  संघात निवड करण्यात आली होती, परंतु त्याचे खेळणे हे तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, यावर अवलंबून होते. दुखातून सावरल्यानंतरही, सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज होण्याकरिता आवश्यक असलेला गोलंदाजीचा सराव पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक वेळेची गरज होती. याच कारणामुळे त्याला या वनडे सीरिजमधून वगळण्यात आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES