SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

4 नोव्हेंबर पासून IND VS NZ वनडे सीरिजला सुरुवात, रोहित - विराट उतरणार मैदानात, कुठे आणि कधी पाहाल सामना?

IND VS NZ ODI Series : 4 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक कुठे आणि कधी पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 05:51 PM IST | Updated: Nov 03, 2026, 06:32 PM IST
Image Credit: 4 नोव्हेंबर पासून IND VS NZ वनडे सीरिजला सुरुवात, रोहित - विराट उतरणार मैदानात, कुठे आणि कधी पाहाल सामना?
Join

IND VS NZ ODI Series : सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी20 सीरिज 3-2 ने आघाडी मिळवून भारताने जिंकली. त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. 4 नोव्हेंबर पासून या सीरिजला सुरुवात होणार असून यात भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा देखील समावेश असणार आहे. या सीरिजमध्ये सुद्धा भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करण्याच्या मनसुब्यानेच मैदानात उतरेल. तेव्हा पाच सामन्यांची ही वनडे सीरिज प्रेक्षक टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुठे पाहू शकता याविषयी जाणून घेऊयात.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या सीरिज मधील पहिला सामना हा 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7: 30 वाजता सुरु होणार आहे. त्यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल.

कुठे पाहाल सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या सीरिज मधील सर्व सामान्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग हे टेलिव्हिजनवर सोनी टीव्हीवर पाहायला मिळेल. तर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अँपवर पाहायला मिळेल. 

हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी मैदानात भयंकर अपघात, स्टार खेळाडूच्या डोक्याला दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं 

भारत विरुद्ध न्यूझीलंड :

4 नोव्हेंबर  - भारत विरुद्ध न्यूझीलंड - पहिला सामना 
7 नोव्हेंबर  - भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुसरा सामना  
10 नोव्हेंबर  - भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना
13 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना 
15 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना

भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, नमन धीर, औकिब नबी, रुतुराज गायकवाड, ईशान किशन.

न्यूझीलंड संघ :

हेन्री निकोल्स, विल यंग, ​​टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टिकनर, टिम सायफर्ट, काइल जेमिसन
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES