दिल्लीतील प्रदूषणामुळे भारत - श्रीलंका सामना शिफ्ट करण्याची मागणी
IND VS SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज 13 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असून पहिला सामना दिल्लीत होणार आहे. मात्र दिल्लीतील प्रदूषणामुळे उभा सामन्याबाबत दिल्ली क्रिकेट बोर्डाने चिंता व्यक्त केली आहे.
IND VS SL : दिल्लीमध्ये प्रदूषणाचा स्तर हा दिवसागणित वाढत चालला असून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात लोकं यामुळे खूप त्रस्त असतात. या समस्येच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला सामना इतरत्र हलवण्याची विनंती केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज 13 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असून पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याच सामन्याबाबत दिल्ली क्रिकेट बोर्डाने आपली चिंता व्यक्त केली आहे.
न्यूज एजेंसी पीटीआयच्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार DDCA ने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासमोर डिमांड ठेवली आहे. याशिवाय स्टेडियममध्ये होणाऱ्या नूतनीकरणाचा सुद्धा हवाला दिला आहे. रिपोर्ट्समध्ये दिल्ली बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की 'प्रदूषण हे मोठं कारण आणि याशिवाय स्टेडियममध्ये नूतनीकरणाचं काम सुद्धा सुरु आहे. म्हणून आम्ही बीसीसीआयला सांगितलं की भारत विरुद्ध श्रीलंका सामना हा दिल्लीच्या बाहेर खेळवला जाईल.
हेही वाचा : विराटने केल्या 74 धावा, अर्शदीपने घेतल्या 4 विकेट्स तरी अंशुल कंबोज कसा ठरला प्लेअर ऑफ द मॅच?
सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता हे पाहणं महत्वाचं असेल की बीसीसीआय याबाबत काय निर्णय करते. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. वनडे सामन्यानंतर तीन सामन्यांची टी20 सीरिजही खेळवली जाणार आहे. मात्र टी20 सीरिजमध्ये एकही सामना दिल्लीत आयोजित केलेला नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सीरिज :
पहिला वनडे: 13 डिसेंबर, दिल्ली
दुसरा वनडे: 16 डिसेंबर, बेंगलुरु
तीसरा वनडे: 19 डिसेंबर, अहमदाबाद