IND vs WI 4th T20 Playing : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिकेचा चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या पाच सामन्याच्या मालिकेमध्ये भारताच्या संघाला आज मालिका जिंकण्याची संधी असणार आहे तर दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघाला मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी असणार आहे. या सामन्यामध्ये आता दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
मागील सामन्यामध्ये टीम इंडियाची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली, त्यामुळे भारताच्या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणतेही बदल केले नाहीत. मागील सामन्यामध्ये प्रिन्स यादवने गोलंदाजीनेच नाही तर फलंदाजीमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली होती. आता सलग चार टी20 वेस्ट इंडिजविरुद्ध सामने झाले आहेत या चारही सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताची विश्वचषक विजेती जोडी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही कायम असणार आहे.
भारतीय संघाची प्लेइंग 11 - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, अक्षर पटेल, मयंक यादव, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिज संघाची प्लेइंग इलेव्हन : शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, शामर स्प्रिंगर, गुडाकेश मोती.
We go unchanged in Hyderabad Updates https://t.co/ksuQbTW6n5 #TeamIndia | #INDvWI | @mflone_ https://t.co/QJT98ytYcE
— BCCI (@BCCI) October 14, 2026