झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया मालिका जिंकणार? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये दुसरा मालिकेचा सामना आज खेळवला जाणार आहे हा सामना कधी आणि कुठे चाहत्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये मालिकेचा दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. स्मृती मानधना टीम इंडियाची नवी कर्णधारच्या नेतृत्वात भारताच्या संघाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेचा पहिला सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे, भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवातीला डगमगला होता त्यानंतर आता टीम इंडियाची युवा खेळाडू निकी प्रसाद आणि दिप्ती शर्माने भारतीय संघाची खेळी सांभाळली आणि संघाला विजय मिळवून दिला. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये टी20 मालिकेचा दुसरा सामना आज रायपूरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. शहीद वीर नारायण सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला सुरुवात संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे तर या सामन्याच्या नाणेफेकीसाठी 6.30 वाजता कर्णधार मैदानात येतील.
या सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने कॅप्टन्सी सोडल्यानंतर स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताने नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा
'हार्दिकच्या जागी पर्याय शोधणे थांबवा...' सुनील गावस्कर यांचा गौतम गंभीरला इशारा!
भारताचा संपूर्ण संघ
स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांति गौड़, गुनालन कमलिनी, प्रेमा रावत, जिन्तिमणि कलिता, मिन्नू मणि
झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ
केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्ने मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिन्दर चारे, तेंडाई मकुशा, कुदजई चिगोरा, लोरिन फिरी, नोमवेलो सिबांडा, चिएड्जा धुरुरू