न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी सुरू असतानाच टीम निवडीवर सध्या मोठी चर्चा रंगलेली दिसतेय. भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी विविध क्रिकेट प्रकारांसाठी वेगवेगळ्या टीम निवडताना काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचं मत मांडलंय. विशेषतः देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या आकिब नबीला कसोटी टीमत संधी न मिळाल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचा मुद्दा, भुवनेश्वर कुमारची टी-२० टीममधीलतील निवड आणि ऋषभ पंतच्या फिटनेसची समस्याही चर्चेत आली आहे. नेमकं काय म्हणालेयत हर्षा भोगले? सविस्तर जाणून घेऊया.
टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दौऱ्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांसाठी टीममध्य बदल करण्यात आले आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूने प्रभावी कामगिरी करणाऱ्या आकिब नबीला कसोटी टीममध्ये स्थान न मिळाल्याबद्दल हर्षा भोगले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, न्यूझीलंडमधील परिस्थितीत नबीसारखा गोलंदाज भारतासाठी उपयुक्त ठरू शकला असता.
मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेट घेत असताना त्याला भारतीय टीममध्ये संधी का मिळत नाही?, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातa/. हर्षा भोगले यांनी या संदर्भात शमीच्या गोलंदाजीच्या स्पेलमधील वेग आणि धार याबाबत काही क्रिकेट जाणकारांच्या निरीक्षणांचा उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ गोलंदाजी करण्यासाठी शमी पूर्णपणे तयार आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.
भुवनेश्वर कुमारचा टी-20 टीममध्ये समावेश झाल्यानेही चर्चा सुरू झाली आहे. हर्षा भोगले यांच्या मते, भुवनेश्वर चार ओव्हरच्या मर्यादित स्वरूपातील क्रिकेटसाठी स्वतःला तयार ठेवत आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेटच्या गरजा वेगवेगळ्या असल्याने एका प्रकारात खेळण्याची तयारी म्हणजे दुसऱ्या प्रकारासाठीही खेळाडू पूर्णपणे तयार आहे, असं म्हणता येत नाही. त्यामुळे गोलंदाजांची निवड करताना त्यांची भूमिका, तंदुरुस्ती आणि विशिष्ट प्रकारातील उपयुक्तता यांचा स्वतंत्र विचार आवश्यक असल्याचे हर्षा भोगले म्हणाले.
ऋषभ पंतच्या फिटनेसविषयक अडचणी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय असल्याचं हर्षा भोगले यांनी नमूद केलं. पंतसारखा सामन्याचं चित्र बदलू शकणारा फलंदाज उपलब्ध नसल्यास संघाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, शुभमन गिल पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांत नेतृत्व करणार असल्याने त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी पुरेसा सराव मिळेल का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात संघनिवड, खेळाडूंचं व्यवस्थापन आणि कसोटी मालिकेपूर्वीची तयारी यांची कसोटी लागणार आहे.