SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आशिया कपसाठी भारतीय संघात मोठा फेरबदल... रजत पाटीदार बाहेर, 'या' अनुभवी खेळाडूला मिळाले संघात स्थान

बीसीसीआयने सोशल मिडियावर आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघात झालेल्या मोठ्या बदलाची घोषणा केली आहे, आता रजत पाटीदारची जागा कोण घेणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 08, 2026, 16:46 IST | Updated: Nov 08, 2026, 17:39 IST
Join

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी रायझिंग आशिया कप 2026 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघ ही स्पर्धा खेळणार आहे तर रजत पाटीदार याला भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. आता बीसीसीआयने एक पोस्ट शेअर केली आहे आणि रायझिंग आशिया कप 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या संघाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. रजत पाटीदार याने बीसीसीआयला माहिती दिली आहे आणि दुखापतीचे कारण देत 50 षटकांच्या या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. रजत पाटीदारचा बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली सर्व माहिती सविस्तर वाचा. 

बीसीसीआयने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, इंडिया 'ए' रायझिंग स्टार्स आशिया कप संघ अपडेट दिली आहे, रजत पाटीदारने बीसीसीआयला कळवले आहे की, तो त्याच्या सध्याच्या दुखापतींवर उपचार घेत असल्याने 50 षटकांच्या फॉरमॅटसाठी त्याच्या नावाचा विचार करू नये. पुढे लिहीले आहे की, रिंकू सिंगची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर आयुष बडोनी हा रजत पाटीदारची जागा घेणार आहे. 

भारताचा संघ हा आशिया कपच्या मोहिमेला सुरुवात 20 नोव्हेंबर रोजी सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा नेपाळविरुद्ध खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना टीम इंडियाचा पाकिस्तान ए शी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा टीम इंडियाचा तिसरा सामना हा यूएईविरुद्ध खेळवला जाणार आहे. 

हे ही वाचा

सेहवाग आणि द्रविड फेल, पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकणार कोण आहे अर्जुन राजपूत?

आशिया कपसाठी भारत 'अ' संघाचा अपडेटेड संघ

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा (विकेटकिपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियान, हर्षित राणा, प्रिंस यादव, अरशद खान, आयुष बडोनी

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES