SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'आम्ही मुंबई इंडियन्ससोबत...', अर्शदीपच्या वडिलांच्या वक्तव्याने ट्रेडवर शिक्कामोर्तब! पहा Video

भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगच्या वडिलांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे आणि या ट्रेडबद्दल स्पष्ट सांगितले आहे. हार्दिकचा मुंबई इंडियन्सकडून पंजाबमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे, तर अर्शदीप पंजाबकडून मुंबईत जाणार आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 10, 2026, 16:28 IST | Updated: Nov 10, 2026, 16:56 IST
Join

मागील काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या आयपीएल 2027 च्या ट्रेडबद्दल अनेक चर्चा पाहायला मिळत आहे. अर्शदीप सिंगला मुंबई इंडियन्समध्ये घेतले जाणार आणि हार्दिक पांड्या पंजाब किंग्जमध्ये जाणार असा दावा मागील काही दिवसांपासून केला जात आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, अर्शदीप सिंग मुंबई संघात सामील होत असल्याची पुष्टी त्याच्या वडिलांनी केली आहे. आता भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगच्या वडिलांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे आणि या ट्रेडबद्दल स्पष्ट सांगितले आहे. हार्दिकचा मुंबई इंडियन्सकडून पंजाबमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे, तर अर्शदीप पंजाबकडून मुंबईत जाणार आहे.

पंजाब आणि मुंबई या अदलाबदलीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार ही अदलाबदली निश्चित झाली आहे. दोन्ही संघ आणि बीसीसीआय यांच्यात अंतिम कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अर्शदीप सिंगचे वडील, दर्शन सिंग यांनी पुष्टी केली आहे की, मुंबई इंडियन्ससोबतची त्याची अदलाबदली निश्चित झाली असून ते यावर खूश आहेत. सोशल मिडियावर एक व्हिडिओ अर्शदीप सिंगच्या वडिलांचा व्हायरल होत आहे यामध्ये त्यांना अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये जाणार याचा दावा त्यांनी केला आहे.

हे ही वाचा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाले संघात स्थान? डिसेंबरमध्ये होणार 7 सामने!

अर्शदीपच्या वडिलांनी पुढे स्पष्ट केले, "प्रत्येक फ्रँचायझीला संतुलन हवे असते, त्यामुळे त्यांनी त्यानुसार त्याचा ट्रेड केला आहे. आम्ही मुंबई इंडियन्ससोबत खूप आनंदी आहोत. तो त्याचा जुना कर्णधार आणि दीर्घकाळचे सहकारी बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार आहे , त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत." अर्शदीपच्या वडिलांनी पुढे सांगितले, "चाहतेही आनंदी आहेत कारण अर्शदीप आणि बुमराह एकत्र खेळतील. ते चांगली कामगिरी करतील आणि कोणालाही 200 धावांचा टप्पा ओलांडू देणार नाहीत व धावसंख्येचा बचाव करतील."

ज्येष्ठ पत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना अर्शदीप सिंगच्या वडिलांनी ही माहिती उघड केली. 'अर्शदीप फ्रँचायझी बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे, अशी काही चर्चा कधी झाली आहे का?' असे विचारले असता, त्याचे वडील म्हणाले, "नाही, कोणतीही चर्चा झाली नव्हती, आम्हालाही अचानकच कळले की हा ट्रेड झाला आहे. कदाचित आता आमंत्रणही आले असेल, पण घडते असे की, माणूस जिथे जन्मतो त्या जागेवर प्रेम करतो आणि आयुष्यभर ती जागा विसरत नाही. पंजाब किंग्स हे असेच एक घरासारखे ठिकाण होते, त्याच्याशी खूप जिव्हाळा होता, हे थोडे जाणवते, पण प्रत्येक फ्रँचायझी आपल्या संघाचा समतोल पाहते, त्यामुळे त्यानुसार त्यांनी त्याला तिथे ट्रेड केले, म्हणून आम्ही मुंबई इंडियन्ससोबतही आनंदी आहोत."

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES