भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्चमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सुद्धा गोलंदाज मोहम्मद सिराज याला प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवण्यात आलं. पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाज संघर्ष करत होते, मात्र तरी देखील संघात बदल न करता पुन्हा सिराजला दोन टेस्ट सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले. सध्याच्या 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' चक्रात SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आता 1983 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी सिराजला संघातून वगळल्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे, तर माजी फलंदाज मोहम्मद कैफ यांनीही या निवडीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
कपिल देवने केलं मोठं वक्तव्य :
कपिल देवने मोहम्मद सिराजबद्दल सहानुभूती व्यक्ती केली. कपिल देवने म्हटलं की, 'तो संघात नाही, याचे मलाही खूप दुःख होत आहे. तो अतिशय उत्साही आणि जोमदार माणूस आहे'. हे उल्लेखनीय आहे की, सध्याच्या 2024-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चक्रात ३२ वर्षीय सिराजने SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 11 सामन्यांत 43 विकेट घेतले आहेत, जे कोणत्याही भारतीय गोलंदाजाद्वारे मिळवलेले सर्वाधिक बळी आहेत. असे असूनही न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला एकही टेस्ट सामना खेळण्याची संधी न मिळणे, ही गोष्ट कोणालाही न समजण्यासारखी आहे.
कपिल देव ऐवजी माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने सुद्धा सोशल मीडियावर सिराजला पुन्हा एकदा ड्रॉप करण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. मोहम्मद कैफने लिहीलं की, 'भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आले आहे, हे विश्वास ठेवणे कठीण आहे. परदेशातील टेस्ट दौऱ्यांसाठी, जसप्रीत बुमराहसोबतच ज्या खेळाडूंची निवड सर्वप्रथम व्हायला हवी, त्यामध्ये सिराजचा समावेश असायला हवा होता'.