आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिचा विवाहसोहळा आज पार पडला. या विवाहसोहळ्याचा पहिला फोटो सोशल मिडियावर तिचा पती आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन याने शेअर केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. सोशल मिडियावर लग्नाचा पहिला फोटो शेअर केल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनने फोटो शेअर करुन एक खास कॅप्शन देखील लिहीले आहे.
सोशल मिडियावर फोटो शेअर करुन फोटोखाली कॅप्शन लिहीले आहे की "माझ्या आयुष्यात एकदाच येणारा, आयुष्यभरासाठीचा क्षण 11.11"… या काही शब्दांनी अनिरुद्ध रविचंद्रन आणि काव्या मारन यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण अविस्मरणीय बनवला आहे. विवाह सोहळ्याचे आयोजन हे देशाबाहेर करण्यात आले होते. पण हा विवाह सोहळा भारतामध्ये देखील केला जाणार आहे. लग्नाचे स्वागत समारंभाचे आयोजन हे 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. या कार्यक्रमाला चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.