कोकेनमुळे अडकला KKR चा माजी क्रिकेटर, 1 महिन्याची लागली बंदी
18 जुलै रोजी टी20 ब्लास्ट स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी ख्रिस लिनची अंमली पदार्थ चाचणी घेण्यात आली. मात्र यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली ज्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली.
Chris Lynn Suspend : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर क्रिस लिनवर एक महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. क्रिस लिनच्या एका ड्रग टेस्टमध्ये कोकेन आढळल असून त्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या रेग्युलेटरने त्याच्यावर एका महिन्याची बंदी लावलेली आहे. 18 जुलै रोजी टी20 ब्लास्ट स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी ख्रिस लिनची अंमली पदार्थ चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी ईसीबी (ECB) च्या एका नियामकाने सांगितले की, लिनने आता आपली एक महिन्याची बंदी पूर्ण केली आहे.
अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं गेलं की, क्रिकेट रेग्युलेटरने नॉर्थेम्पटनशायर स्टीलबॅक्सचे माजी खेळाडू क्रिस लिनवर एका महिन्याची बंदी घालण्यात आली होती. निलंबनाचा कालावधी आता संपला आहे. लिनने कोकेनच्या सेवनाचे आरोपही मान्य केले होते.
आधी होती तीन महिन्यांची बंदी :
क्रिस लिनवर आधी तीन महिन्याचा बंदी लावण्यात आलेला. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेटरमी रिहॅबिलिटेशन पूर्ण केला. ईसीबी (ECB) रेग्युलेटरने मान्य केले की, ख्रिस लिनने प्रतिबंधित पदार्थांचा वापर कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने केला नव्हता. परिणामी त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेनंतर निलंबनाचा कालावधी तीन महिन्यांवरून कमी करून एक महिना करण्यात आला.
18 जुलैला नॉर्थेम्पटनशायर स्टीलबॅक्सने टी20 ब्लास्टच्या फायनलमध्ये हॅम्पशायर हॉक्स यांना 14 धावांनी पराभूत केलं होतं. याशिवाय जवळपास एक महिन्याच्यानंतर 20 ऑगस्ट रोजी क्रिस लिनने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आणि त्याने स्वीकारले की 15 जुलै आणि 16 जुलै रोजी त्याने कोकेनचे सेवन केले होते. 31 जुलै रोजी रेग्युलेटरने क्रिस लिनला सांगण्यात आलं होतं की त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. अखेर 30 ऑगस्ट रोजी खेळाडूवरची बंदी उठली.