भारताच्या संघाची टी20 आगामी विश्वचषक होण्याआधी आता लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेवर नजर असणार आहे. भारताच्या संघाने 2026 मध्ये झालेल्या आणि 2024 च्या टी20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे त्यामुळे आता सर्वच संघ या ऐतिहासिक स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. ऑलिम्पिकमध्ये 1904 मध्ये पहिल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आता आयसीसीने पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक संस्थेचे काही महत्त्वाचे नियम आणि क्वालिफिकेशसाठी स्पर्धा होणार आहे त्यासंदर्भात सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑक्टोबरमध्ये दुबई येथे झालेल्या बैठकांनंतर आपल्या सदस्य मंडळांना जागतिक स्पर्धांची यादी दिली आहे. यामध्ये पात्रता स्पर्धांच्या तारखांचाही समावेश आहे. अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांच्या पात्रता फेरीत आठ देश या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या संघांना आयसीसीकडून अंतिम रूप दिले जाईल. 100 वर्षांहून अधिक काळानंतर 2028 मध्ये क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होईल. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या संघाने आधीच स्थान निश्चित केले आहे, भारतासह महिला संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ग्रेट ब्रिटन यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. या टी20 विश्वचषकामध्ये महिला संघांनी केलेल्या कामगिरीच्या आधावर देश पात्र ठरले आहेत.
हे ही वाचा
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हे 2028 मध्ये होणार आहे, त्यासाठी आयसीसीने 2027 मध्ये पात्रता फेरीसाठी योजना आखली आहे. क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आयसीसीने पात्रता फेरीचे आयोजन हे जानेवारी-फेब्रुवारी 2028 मध्ये केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या सहा संघांचे वेळापत्रक आणि स्पर्धेची रचना जूनमध्ये जाहीर करण्यात आली. महिलांच्या स्पर्धेत, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी20 विश्वचषकातील कामगिरीच्या आधारावर, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि ग्रेट ब्रिटन हे आपापल्या खंडांमधील सर्वोच्च मानांकित संघ म्हणून पात्र ठरले आहेत.
पुरुषांच्या गटात, 31 डिसेंबर 2026 रोजीच्या क्रमवारीनुसार आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनियामधील अव्वल चार संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. यजमान अमेरिका पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहे, मात्र त्यासाठी त्यांना 30 जून 2026 ते 31 डिसेंबर 2026 या पात्रता कालावधीत अव्वल 15 मध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. जर अमेरिका 31 डिसेंबर 2026 पर्यंत ही क्रमवारीची अट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली, तर महिलांच्या गटातील तिचे स्थान आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 मधील क्रमवारीच्या आधारावर निश्चित केले जाईल. यासाठीची अंतिम तारीख 1 मार्च 2027 आहे.