सिराजला दुसऱ्या कसोटीत स्थान मिळणार का? एका क्लिकवर वाचा IND vs NZ सामन्याची संपूर्ण माहिती
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा सामना हा दुसरा कसोटी सामना असणार आहे या भारताचा न्यूझीलंड दौऱ्यावर शेवटचा सामना असणार आहे, या सामन्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर वाचा.
कसोटी मालिकेचा पहिला सामना अनिर्णयित राहिल्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेचा दुसरा सामना काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु होणारा सामना हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी भारताच्या संघाला आणि न्यूझीलंडच्या संघाला विजयाची गरज आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा सामना हा दुसरा कसोटी सामना असणार आहे या भारताचा न्यूझीलंड दौऱ्यावर शेवटचा सामना असणार आहे, या सामन्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर वाचा.
कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामन्याला सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याला न्यूझीलंडमध्ये 11.00 वाजता सुरुवात होणार आहे तर भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला सुरुवात पहाटे 3.30 वाजता होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक भारतीय वेळेनुसार 3.00 वाजता पहाटे होईल. या सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहते पाहू शकतात. त्याचबरोबर तुम्ही हा सामना मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्यूटरवर देखील पाहता येणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्हवर पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत काही खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती. प्रसिद्ध कृष्णाने वेलिंग्टनमध्ये पहिल्या डावात केवळ एक बळी घेतला, तर दुसऱ्या डावात त्याने दोन बळी घेतले. अंतिम 11 खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. सिराज एक अनुभवी गोलंदाज असून त्याने कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी सामना जिंकून देणारा खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. पहिल्या कसोटीतून त्याला वगळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता प्रसिद्धच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
हे ही वाचा
भारत फायनलमध्ये पोहोचणार का? आजच्या सेमीफायनलमध्ये भिस्त, शेजारच्या देशाचे आव्हान!
आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असूनही, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले. सुंदरने त्या सामन्यात केवळ एक बळी घेतला आणि 24 धावा केल्या. त्याची कामगिरी निराशाजनक होती आणि त्याला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी रवींद्र जडेजाची निवड होऊ शकते.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह