• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /भारत फायनलमध्ये पोहोचणार का? आजच्या सेमीफायनलमध्ये भिस्त, शेजारच्या देशाचे आव्हान!

भारत फायनलमध्ये पोहोचणार का? आजच्या सेमीफायनलमध्ये भिस्त, शेजारच्या देशाचे आव्हान!

यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजीने प्रभावी कामगिरी दाखवली. आता भारताचा संघासमोर श्रीलंका अ संघाचे आव्हान असणार आहे, त्यामुळे भारताच्या संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 26, 2026, 10:51 IST|Updated: Nov 26, 2026, 11:07 IST
joinshare
भारत फायनलमध्ये पोहोचणार का? आजच्या सेमीफायनलमध्ये भिस्त, शेजारच्या देशाचे आव्हान!

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

India A vs Sri Lanka A Semi final :  भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चा सेमीफायनलचा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे, आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवणार तो संघ फायनलमध्ये स्थान पक्के करणार आहे. वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणाऱ्या सेमीफायनल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजीने प्रभावी कामगिरी दाखवली. आता भारताचा संघासमोर श्रीलंका अ संघाचे आव्हान असणार आहे, त्यामुळे भारताच्या संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या संघाने काही महत्त्वाचे प्लेइंग 11 मध्ये बदल केले होते. आयुष बडोनी त्याचबरोबर प्रिन्स यादव आणि विप्रज निगमसारख्या खेळाडूंना प्लेइंग 11 मधून बाहेर केले होते. त्याच्या जागेवर अरशद खान, प्रभसिमरण सिंग आणि हर्ष दुबे या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. भारताचा ग्रुप स्टेजचा शेवटचा आणि महत्त्वाचा सामना हा यूएईविरुद्ध पार पडला. या सामन्यामध्ये यूएईच्या संघाला वैभव सूर्यवंशीने एकतर्फी पराभूत केले. वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध सामन्यात 53 चेंडूमध्ये 204 धावा केल्या त्याच्या या खेळीने तो पुन्हा चांगल्या फॅार्ममध्ये आल्याचे दिसले.

हे ही वाचा

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात खेळणार सिरीज, वाचा संपूर्ण वेळापत्रक!

यूएईविरुद्द सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीनंतर आता तो श्रीलंका ए विरुद्ध कामगिरी करणार याकडे सर्वांची नजर असणार आहे. तर अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले होते पण तो यूएईविरुद्ध पूर्णपणे फेल झाला. त्याचबरोबर भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा देखील या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला त्याने आतापर्यत सर्वाधिक धावा भारतीय संघासाठी केल्या आहेत. एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये, इंडिया 'अ' संघाने गट टप्प्यात दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. भारताने गट 'ब' मध्ये दुसरे स्थान पटकावले असून, आता त्यांचा सामना गट 'अ' मधील अव्वल संघ असलेल्या श्रीलंकेशी होईल.

इंडिया 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना आज, 26 नोव्हेंबर रोजी दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे नाणेफेक हे 3.00 वाजता होणार आहे. भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील आशिया कप रायझिंग स्टार्स उपांत्य फेरीचा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. समालोचन इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असेल. चाहते सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही हा सामना थेट पाहू शकतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Sports News