IND vs NZ सामन्यादरम्यान मोहम्मद सिराज इशान किशनवर संतापला, नक्की झाले काय?
भारत विरुद्ध न्यूझीलंड हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान मैदानावर एक असा क्षण आला, जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपला संयम गमावला आणि यष्टीरक्षक इशान किशनवर सर्वांसमक्ष संताप व्यक्त केला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पाचवा सामना आज पार पडला. भारताच्या संघाने ही मालिका 3-1 अशी जिंकली आता टीम इंडियाच्या संघाची नजर कसोटी मालिकेवर असणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे, पण या एकदिवसीय मालिकेच्या सामन्यामध्ये मोहम्मद सिराज टीम इंडियाचा विकेटकिपर इशान किशनवर संतापलेला पाहायला मिळाला. या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान मैदानावर एक असा क्षण आला, जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपला संयम गमावला आणि यष्टीरक्षक इशान किशनवर सर्वांसमक्ष संताप व्यक्त केला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये ही घटना न्यूझीलंडच्या डावाच्या 46 व्या ओव्हरमध्ये घडली. सामना निर्णायक टप्प्यावर होता आणि भारत विजयासाठी शेवटच्या विकेट्सच्या शोधात होता. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता आणि न्यूझीलंडचा तळाचा फलंदाज ब्लेअर टिकनर खेळपट्टीवर होता. सिराजच्या एका अप्रतिम चेंडूने टिकनरच्या बॅटची बाहेरील कड घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या बाजूने चार धावांसाठी गेला. चेंडू सीमारेषेबाहेर जाताना पाहून सिराज स्पष्टपणे अस्वस्थ झाला होता. मोहम्मद सिराजला वाटले की, जर यष्टीरक्षक इशान किशन त्याच्या नेहमीच्या जागी उभा असता, तर तो झेल तुलनेने सहज घेतला गेला असता. सिराजने खेळपट्टीवरून इशान किशनकडे रागाने हातवारे करून आपली नाराजी व्यक्त केली.
अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती आणि संपूर्ण संघ 42.1 षटकांत केवळ 209 धावांवर सर्वबाद झाला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडला 48.1 षटकांत 187 धावांवर बाद केले आणि भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग भारताच्या विजयाचा नायक ठरला, त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन बळी घेतले आणि फलंदाजी करताना १४ धावा केल्या. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अर्शदीपने आपल्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 30 धावा देत तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले.