SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूची सुवर्ण कामगिरी, कोण आहे मोना अग्रवाल? एशियन गेम्समध्ये रचला इतिहास

Asian Para Games 2026 : भारताला मोना अग्रवाल हिने हिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारताचे यंदाच्या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक ठरले.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 19, 2026, 01:31 PM IST | Updated: Oct 19, 2026, 02:19 PM IST
Image Credit: एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूची सुवर्ण कामगिरी
Join

Asian Para Games 2026 : एशियन पॅरा गेम्स 2026 ही स्पर्धा 18 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताला मोना अग्रवाल हिने स्पर्धेतील यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि यादरम्यान एशियन पॅरा गेम्समध्ये नवा विक्रमही रचला. महत्वाची गोष्ट अशी की भारताला रौप्यपदकही याच प्रकारात मिळाले.

2028 पॅरा ऑलम्पिकसाठी झाली क्वालिफाय :

मोना अग्रवाल हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच1 प्रकारात 250 गुणांची नोंद करत केवळ एशियन पॅरा गेम्स विक्रमच मोडला नाही, तर सुवर्णपदकही पटकावले. याच प्रकारात भारताच्या अवनी लेखरा हिने 249.6 गुणांसह रौप्यपदक जिंकले. या विजयामुळे भारतीय नेमबाजांनी 2028 च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.

मागच्या एशियन पॅरा गेम्समध्ये अवनी लेखाराने सुवर्णपद जिंकलं होतं. मात्र यावेळी अवनी 0.4  गुणांच्या फरकाने आपले सुवर्णयश पुन्हा मिळवण्यापासून हुकली. मोना अग्रवालने तिला पराभूत करून एशियन पॅरा गेम्समधील आपले पहिले पदक जिंकले. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 प्रकारात मोनाने पात्रता फेरीत 629.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि एशियन गेम्समध्ये विक्रमही प्रस्थापित केला. त्याच पात्रता फेरीत अवनी लेखरा हिने 626.4 गुण नोंदवले होते.

कोण आहे मोना अग्रवाल?

मोना अग्रवालचा जन्म हा राजस्थानच्या सीकरमध्ये झाला असून वॉलीबॉल सहित सर्व खेळ खेळल्यावर मोनाने 2021 मध्ये शूटिंगमध्ये आपलं करिअर बनवण्याचं ठरवलं. मोना जेव्हा 9 महिन्याची होती तेव्हा तिला पोलिओ झाला होता. मोना आपल्या 3 बहिणींमध्ये सर्वात लहान होती. तिच्या दोन मोठ्या बहिणींच्या जन्मानंतर तिच्या पालकांना मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे कुटुंबात मोनाकडे नको असलेले मुलं म्हणून पाहिले जात असे. मात्र तिची आजी गीतादेवी, नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES