SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

MS Dhoni New Home At Ranchi : एम एस धोनी याचं रांचीमध्ये तिसरं घर बनत असून सध्या त्याच्या या आलिशान घराचा व्हिडीओ समोर आला आहे. बांधकामाधीन असलेल्या या घराची धोनी आणि पत्नी साक्षी स्वतः पहाणी करत आहेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 29, 2026, 20:34 IST | Updated: Nov 29, 2026, 21:22 IST
Image Credit: रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर
Join

MS Dhoni New Home At Ranchi : भारताचा माजी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी याने नुकतीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा मेंटॉर म्हणून दिसणार आहे. एम एस धोनी हा मूळचा रांची झारखंड येथील असून त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात सुद्धा या छोट्याश्या शहरातून झाली. पुढे जाऊन त्याने भारताचे नेतृत्व करत असताना तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या. रांचीमध्ये याआधी एम एस धोनीची दोन घरं असून आता एम एस धोनीचं तिसरं घर सुद्धा रांचीमध्येच आहे. धोनीचं  हे नवं घर एका डोंगर टेकडीवर बनत असून रिपोर्ट्सनुसार या घराचं बजेट हे जवळपास 40 कोटी इतकं असणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एम एस धोनी हा हे घर बनत असताना पाहायला गेला असल्याचे दिसते.  

कुठे कुठे आहेत धोनीची घरं?

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने वर्ष 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रांचीमध्ये याआधी सुद्धा धोनीची दोन घरं आहेत. यातील पहिलं घर हे रांचीच्या हरमू येथे तर सध्या धोनी राहत असलेलं घर हे सिमरिया भागात आहे. तर धोनीचं बांधकामाधीन असणारं नवं घर हे रांचीच्या रिंग रोड येथील सेंबो भागात असून त्याच्या घराच्या जमिनीचा प्लॉट 822, 1314, 1322 आणि 1324 मध्ये पसरलेली आहे.

हेही वाचा : 'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video

 मिळालेल्या माहितीनुसार धोनीचे नवीन घर 2 एकरच्या भूखंडावर बांधले जात आहे. हे घर रांची रिंग रोडजवळील 'सॅम्बो हिल' येथे स्थित असून, धोनीने नुकतीच या जागेला भेट दिली होती. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असे मानले जाते की धोनीच्या या नवीन घरामध्ये एक खाजगी जिम, स्विमिंग पूल आणि इनडोअर खेळांसाठी एक स्वतंत्र जागा असेल. तसेच त्याच्या घोड्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठीही तिथे स्वतंत्र व्यवस्था असेल अशी अपेक्षा आहे. एम एस धोनी सध्या राहत असलेलं फार्म हाऊस हे कैलाशपतिच्या नावाने ओळखलं जातं. हे फार्म हाऊस 7 एकरमध्ये पसरलेलं असून यात क्रिकेट प्रॅक्टिससाठी नेट, स्विमिंग पूल, जीम, बाईक्ससाठी मोठी पार्किंग इत्यादी आहेत. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES