SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गुजरातमध्ये जन्मला पण न्यूझीलंडसाठी खेळला क्रिकेट, 38 व्या वर्षी स्टार क्रिकेटरने जाहीर केली निवृत्ती

Jeet Raval Retired : 38 वर्षां न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर जीत रावलने प्रोफेशनल क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. जीव रावल हा भारतीय मूळचा क्रिकेटर आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 09, 2026, 01:55 PM IST | Updated: Oct 09, 2026, 02:32 PM IST
Join

Jeet Raval Retired : न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर आणि भारतीय मूळचा क्रिकेटर जीत रावलने 2026-27 च्या देशांतर्गत सीजनपूर्वी प्रोफेशनल क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 38 वर्षांच्या या डाव्या हाताच्या फलंदाजाने न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातून जवळपास 2016 ते 2020 दरम्यान 24 टेस्ट सामने खेळले. मैदानाला निरोप दिल्यानंतर रावल आता आपल्या दुसऱ्या इनिंग्जवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे. जीत रावल हा एका ऑडिटिंग फर्ममध्ये चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून काम करत असून आता क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याचा पूर्णवेळ हाच व्यवसाय असणार आहे.

जीत रावलने निवृत्तीची घोषणा :

गुजरातमध्ये जन्मलेल्या जीत रावलचा क्रिकेटमधील प्रवास खूपच मजेदार होता. रावल यांनी अहमदाबादमधील विद्यानगर शाळेत भारताचे माजी विकेटकिपर -फलंदाज पार्थिव पटेल यांच्यासोबत शिक्षण घेतले. शालेय काळात ते पार्थिव पटेल यांचे सलामीचे जोडीदार होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब गुजरात सोडून ऑकलंडमध्ये स्थायिक झाले. जीत रावलने न्यूझीलंडच्या अंडर 19 संघात आपली वेगळी ओळख निर्माण केली. डिसेंबर 2008 मध्ये त्याने वेस्टइंडिज विरुद्ध ऑकलँडकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जीत रावलने वर्ष 2016 मध्ये क्राइस्टचर्च येथे पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं होतं. त्याने 24 टेस्ट सामन्यात 1 शतक आणि 7 अर्धशतक लगावले आहेत. 2021 मध्ये भारताचा पराभव करून पहिल्या 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंडच्या संघात ते सदस्य होते.

काय म्हणाला जीत रावल?

जीत रावलने निवृत्तीची घोषणा केल्यावर म्हटलं की, 'हा निर्णय घेणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला पूर्ण समाधान आणि मानसिक शांतता लाभली आहे. ब्लॅक कॅप्ससाठी खेळणे हे माझे बालपणीचे स्वप्न होते आणि आज मागे वळून पाहताना मला अभिमान वाटतो. हे केवळ माझेच स्वप्न नव्हते, तर माझ्या वडिलांचेही होते. त्यांनी एक संधी हेरली आणि संपूर्ण कुटुंबाला न्यूझीलंडला आणले, जेणेकरून मी हे स्वप्न साकार करू शकेन.'

जीत रावलने ठोकल्या 10000 धावा :

जीत रावल हा न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक विश्वासू आणि दिग्गज सलामी फलंदाजात गणला जातो. त्यांनी आपल्या 292 फर्स्ट क्लास इनिंगपैकी 285 डावांत ओपनर म्हणून फलंदाजी केली आणि 37.36 च्या सरासरीने 10127 धावा केल्या. यात 23 शतकांचा समावेश आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण करणारे ते न्यूझीलंडचे 30 वे फलंदाज ठरले.

न्यूझीलंडची फर्स्ट क्लास स्पर्धा प्लंकेट शील्डमध्ये त्यांनी 8662 धावा केल्या. या स्पर्धेच्या संपूर्ण इतिहासात केवळ मायकल पॅप्स, मॅथ्यू सिंक्लेअर आणि पीटर फुल्टन यांनीच त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने 2024-25 च्या सिजनमध्ये 'नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स'ला 'प्लंकेट शील्ड'चे विजेतेपद मिळवून दिले; एका दशकाहून अधिक काळानंतर त्यांना हे यश मिळाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES