पाकिस्तान - इंग्लंड सामन्यात जबरदस्त ड्रामा, पॅव्हेलियनमध्ये परतत होता खेळाडू, तेवढ्यात अंपायरने थांबलं आणि सामना पलटला
PAK VS ENG : पाकिस्तान - इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या त्रिकोणीय सीरीजच्या चौथ्या सामन्यात जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला शादाब खान याच्या विकेट वरून गोंधळ पाहायला मिळाला होता.
PAK VS ENG : क्रिकेटच्या खेळात सामना संपला असं तोपर्यंत मानलं जात नाही, जोपर्यंत खेळाडू मैदानाच्या बाहेर जात नाहीत. बऱ्याचदा सामना संपला की दोन्ही संघाचे खेळाडू खेळाडू इतर संघातील खेळाडूंशी हात मिळवतात आणि आपआपल्या ड्रेसिंग रूममध्ये परतात. ,तर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या त्रिकोणीय सीरीजच्या चौथ्या सामन्यात काही वेगळंच पाहायला मिळालं.
लाहोरच्या गद्दाफी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडने 242 धावांचं टार्गेट दिलं होतं. त्यांच्या बचावात इंग्लंडच्या संघाने सुद्धा जबरदस्त सुरुवात केली. पाकिस्तानच्या 154 धावांवर 9 विकेट्स पडल्या होत्या. इथून इंग्लंडचा विजय निश्चित वाटत होता, परंतु शादाब खान भिंतीसारखा खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे सामना पूर्णपणे पलटला.
97 धावांवर शादाब झालेला LBW :
शादाब खान पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी निकराचा प्रयत्न करत होता, परंतु 97 धावांवर असताना गस ॲटकिन्सनचा एक फुल टॉस बॉल त्याला खेळता आला नाही. बॉल थेट स्टंपच्या रेषेत त्याच्या पॅडला लागला. अंपायरने शादाब खानला 'आऊट' घोषित केले, ज्यामुळे स्टेडियममधील प्रेक्षक नाराज सुद्धा झाले. या टप्प्यावर पाकिस्तान विजयापासून 20 धावा दूर होता. टीव्ही स्क्रीनवर इंग्लंडच्या विजयाचे संकेत दिसू लागले होते. खेळाडू हॅन्डशेक करून औपचारिकता पूर्ण करत होते. काही इंग्लिश खेळाडू शतक हुकल्याबद्दल शादाब खानचे सांत्वन करत होते, पण तितक्यात डीआरएस निर्णयाचा निकाल समोर आला.
शादाबने जिंकवला सामना :
पाकिस्तानकडे दोन रिव्ह्यू शिल्लक होते. LBW साठी अपील केल्यानंतर शादाबला स्वतःलाच ठाऊक होते की बॉल अचूक टप्प्यावर पडला आहे आणि तो बाद झाला आहे, परंतु नशीब पाकिस्तानच्या बाजूने होते. रिव्ह्यू घेतल्यावर, थर्ड अंपायरच्या निदर्शनास आले की बॉल पॅडला लागण्यापूर्वी बॅटच्या कडेला स्पर्श करून गेला होता. परिणामी, शादाब खानला 'नॉट आऊट' घोषित करण्यात आले. शादाब शेवटपर्यंत नाबाद राहिला त्याने 96 बॉल 113 धावा केल्या आणि पाकिस्तानला 1 गडी राखून विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 सिक्स लगावले.