पाकिस्तान सुपर लीगच्या तारखांची घोषणा, पुन्हा IPL आणि PSL स्पर्धा होणार क्लॅश?
2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुख लीगच्या वेळापत्रकांमध्ये पहिल्यांदाच थेट संघर्ष दिसून आला होता. मागच्या वर्षी 2026 सुद्धा अशीच परिस्थिती उद्धवली होती तर आता आगामी वर्षात सुद्धा आयपीएल आणि पीएसएल स्पर्धांच्या तारखा क्लॅश होण्याची शक्यता आहे.
Cricket News : आगामी 2027 मध्ये आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग या दोन स्पर्धांमध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सुपर लीगने घोषणा केली असून या स्पर्धेचा 12 वा सीजन 18 मार्च पासून सुरुवात होणार आहे, तर याचा फायनल सामना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुख लीगच्या वेळापत्रकांमध्ये पहिल्यांदाच थेट संघर्ष दिसून आला होता. अशीच परिस्थिती 2026 मध्येही उद्भवली होती आणि आता पुढील वर्षी 'पाकिस्तान सुपर लीग' आणि 'इंडियन प्रीमियर लीग' यांच्या वेळापत्रकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष होणार आहे.
पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन 18 मार्च ते 2 मे पर्यंत होणार आहे. आयपीएलचे आयोजनही मार्च ते मे या कालावधीत होत असल्याने, जगातील या सर्वात मोठ्या फ्रँचायझी लीगमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुन्हा एकदा आर्थिक नुकसान सोसावे लागण्याचा धोका वाढला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टेटमेंट जाहीर करून सांगितलं आहे की सर्व स्टेकहोल्डर्स आणि पार्टनर्स सोबत बोलल्यावर पाकिस्तान बोर्डने या तारखा निश्चित केल्या आहेत. स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यावर आता प्लेअर ऑक्शन पासून संघांची रिटेन्शन लिस्ट, डायरेक्ट सायनिंग आणि कोणते खेळाडू ट्रेड होतात की नाही यावर सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये टक्कर :
2026 मध्ये पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. पीएसएलचा 11 वा सीजन 26 मार्च ते 3 मे या कालावधीत पार पडला, तर आयपीएल 2026 चे सामने 28 मार्च ते 31 मे दरम्यान खेळले गेले. असे असूनही पीसीबीचा दावा आहे की पीएसएलच्या 11 व्या सीजनचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 32,461 प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती होती.
आता पीएसएलच्या 12 व्या सीजनचं आयोजन 18 मार्च पासून सुरु होणार आहे. तर फायनल सामना 2 मे रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2027 च्या तारखा अजून स्पष्ट नाहीत. मात्र रिटेंशन लिस्ट जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन ठेवण्यात आली आहे. तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठव्यात मिनी ऑक्शन पार पडेल.