SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पॅरा एशियन गेम्समध्ये भारताच्या पदकांच्या संख्येत मोठी वाढ, आतापर्यंतचं बेस्ट प्रदर्शन

Para Asian Games 2026 : जपानच्या आइची नागोयामध्ये झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये भारताच्या खेळाडूंनी 114 पदक जिंकली आहेत. भारताने यंदा खेळाडूंची खूप छोटी तुकडी पाठवलेली असताना सुद्धा अनेक खेळाडूंनी पदक मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 25, 2026, 06:07 PM IST | Updated: Oct 25, 2026, 06:54 PM IST
Image Credit: पॅरा एशियन गेम्समध्ये भारताच्या पदकांच्या संख्येत मोठी वाढ, आतापर्यंतचं बेस्ट प्रदर्शन
Join

Para Asian Games 2026 : भारताने जपानच्या आइची नागोयामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये 114 पदकं जिंकून इतिहास रचला. यावेळी भारताकडून खेळाडूंची खूप छोटी तुकडी पाठवण्यात आलेली. मात्र असं असताना सुद्धा पदकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारताने 2010 मध्ये झालेल्या पहिल्या पॅरा एशियन गेम्समध्ये 14 पदकं जिंकले होते. त्यानंतर प्रत्येक सीजनमध्ये भारतीय दलाचं प्रदर्शन हे जबरदस्त राहिलं. आता 2026 मध्ये पदकांची संख्या ही 114 पर्यंत पोहोचली आहे. 2022 च्या तुलनेत भारताने 2026 च्या स्पर्धेत निम्म्या स्पर्धकांना जपानमध्ये पाठवले होते.

2023 मध्ये हांगझू येथे झालेल्या मागील पॅरा आशियाई खेळांसाठी भारताने 309 खेळाडूंचे पथक पाठवले होते. यावेळी जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताचे 168 पॅरा ॲथलीट सहभागी झाले होते. असे असूनही भारताने 114 पदके जिंकली जी आजवरची देशाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारताने 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य पदकं मिळवली. या कामगिरीसह भारतीय पथकाने मागील आवृत्तीतील आपल्या पदकसंख्येला मागे टाकले आहे. 2023 मध्ये भारताने 108 पदके जिंकली होती आणि यावेळी एकूण पदकांच्या संख्येत सहाने वाढ झाली आहे.

एथलेटिक्सने मिळून दिली सर्वाधिक पदकं :

भारताच्या यशामागे पॅरा एथलेटिक्सचं सर्वात मोठं योगदान आहे. भारताच्या खेळाडूंनी या खेळात एकूण 65 पदकं जिंकली ज्यात 22 सुवर्ण, 19 रौप्य आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे. यात पॅरा बॅडमिंटन दुसऱ्या स्थानावर असून या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 16 पदकं मिळवली. याव्यतिरिक्त त्यांनी पॅरा स्वीमिंगमध्ये 11, पॅरा टेबल टेनिसमध्ये सात, पॅरा आर्चरीमध्ये सहा आणि पॅरा शूटिंगमध्ये पाच पदके जिंकली. भारताच्या एकूण 114 पदकांपैकी 81 पदकं ॲथलेटिक्स आणि बॅडमिंटन या खेळांतून मिळाली आहेत. म्हणजेच भारताच्या एकूण पदकसंख्येमध्ये या दोन खेळांचे योगदान 70 टक्क्यांहून अधिक आहे.

भारत चौथ्या स्थानावर:

भारताने पदकांची मेडल टॅलीमध्ये चौथ स्थान मिळवलं आहे. चीन 435 पदकं मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिला, जपान 186 पदकं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, तर उझबेकिस्तान 145 पदकं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताने दक्षिण कोरियाला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. ही कामगिरी भारतीय पॅरा स्पोर्ट्समधील वाढती स्पर्धात्मकता आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी खेळाडूंची अधिक चांगली तयारी दर्शवते. मात्र पदकांचा मोठा हिस्सा केवळ काही निवडक खेळांतूनच आला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात इतर खेळांमध्येही पदकं जिंकण्याची क्षमता वाढवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES