मागील काही दिवसांपासून उस्मान ख्वाजाने सँडपेपर गेट प्रकरणासंदर्भात अनेक मोठे खुलासे केले आहेत. यावर ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी या धक्कादायक प्रकरणासंदर्भात उस्मान ख्वाजाने केलेल्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. त्यानंतर आता मागील काही काळापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा आताचा कर्णधार पॅट कमिन्सने यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्याने मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सँडपेपर गेट प्रकरणासंदर्भात उस्मान ख्वाजाने केलेले खुलासे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी पॅट कमिन्स म्हणाला, "जेव्हा उस्मान म्हणतो की आम्हा सर्वांना माहीत होतं... जर त्याचा अर्थ असा असेल की मैदानावर सँडपेपर वापरला जाणार आहे हे आम्हाला माहीत होतं, तर तो शंभर टक्के चुकत आहे. मी गेल्या आठ वर्षांपासून हेच सांगत आहे. मला याची काहीच कल्पना नव्हती, पण मला वाटतं की उस्मान खरंतर त्यापेक्षाही अधिक गंभीर गोष्टी बोलत आहे. तो म्हणतो की मी आणि इतर जण सँडपेपरमध्ये फेरफार करण्याच्या योजनेचे सूत्रधार होतो. ही निव्वळ बकवास आहे."
हे ही वाचा
कमिन्सने पुढे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की, ख्वाजा यांना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु असे आरोप करण्याची जबाबदारीही असते. अशा आरोपांचा इतरांच्या जीवनावर परिणाम होतो. ते म्हणाले, "त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. त्यांना असे करण्याची मुभा आहे याचा मला आनंद आहे. मात्र, आपण जे बोलतो आणि करतो त्यासाठी आपण सर्वांनी जबाबदार असले पाहिजे."
जेव्हा एका पत्रकाराने कमिन्सला विचारले की कोणाची बाजू खरी आहे, तेव्हा तो म्हणाला: "ही माझी कहाणी आहे. त्यामुळे मला वाटतं की तो चुकत आहे... मला ऑस्ट्रेलियन क्रिकेट खूप आवडतं. त्याने मला खूप काही दिलं आहे. त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर खूप मोठा परिणाम होतो, आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने त्याने त्याची कहाणी सांगितली आहे, ती त्याने खूप सहजपणे सांगितली आहे. त्याचा अनेक लोकांवर परिणाम होतो, आणि सध्या मी याच गोष्टीशी झगडत आहे, कारण मला वाटत नाही की हे योग्य आहे."